आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या भारताचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाईल. जागतिक स्तरावर मंदीचे सावट घोंघावत असताना अर्थसंकल्पातून देशातील सामान्य नागरिकांना, नोकरदार, करदाते, उद्योजक यांना काय मिळणार? याकडे सर्वच घटकांचे लक्ष लागलेले आहे. अर्थसंकल्प म्हटला की आपण फक्त कर रचना, काय महाग झालं, काय स्वस्त झालं? सरकारने आता नवीन काय विकलं? किंवा नवीन योजना काय आणणार आहे? याकडे जास्त लक्ष देतो. पण या पलीकडेही अर्थसंकल्पात काही तरतूदी असतात. ज्या असायला हव्यात. नेमकं “आदर्श बजेट” आदर्श अर्थसंकल्प म्हणजे काय? याचं उत्तर चॅटजीपीटी या आर्टिफिशियल इंजेलिजन्स प्लॅटफॉर्मने दिला आहे. तुम्हालाही हे उत्तर वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल.

ChatGPT ने काय उत्तर दिलं?

चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नांवर खालीलप्रमाणे मुद्देसूद उत्तर देण्यात आले.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
Astrological Predictions Future of India 2024 and Narendra Modi Government in Marathi
Astrological Predictions India 2024 : ‘आर्थिक झळ ते मानसिक समस्यांमध्ये वाढ’; शनीची वक्रदृष्टी? भारताचे पुढे काय होणार? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
BRICS summit
‘ब्रिक्स’ची २०२६ पर्यंत जागतिक व्यापारात जी७ देशांना मात
How stable is the return of Standard Deviation Fund SBI Midcap Fund Mmdc
Money Mantra: फंडांचा फंडा- एसबीआय मिडकॅप फंड

शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक,
रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेचा विकास साधणे,
करामध्ये सुधारणा आणि कर रचनेत सुलभता आणणे,
शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देणे,
नव उद्योजकांना चालना देऊन परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणारी धोरणे आखणे,
आर्थिक विषमता आणि गरिबी कमी करण्यावर लक्ष देणे,
कार्बन उत्सर्जन कमी करत पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या योजना आखणे,
सरकारी खर्च कमी करुन वित्तीय तूट कमी करणे,
तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक,
गतीमान प्रशासनासाठी नवी धोरणे आखणे

हे वाचा >> अर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो? ब्रिटिश पद्धत स्वतंत्र भारतात पहिल्यांदा कुणी मोडली?

हे वाचा >> ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र, मुंबईसाठी विशेष तरतूद करा,’ संजय राऊतांची केंद्राकडे मागणी; म्हणाले, “हा पैसा भाजपाचा नव्हे, तर…”

अर्थसंकल्पाच्या इतर प्रश्नांवर चॅटजीपीटीचे उत्तर

“आदर्श अर्थसंकल्प काय असतो?” असा प्रश्न अमित परांजपे यांनी चॅटजीपीटीला विचारला होता त्यावर आलेले उत्तर परांजपे यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहे. फक्त एवढेच नाही तर “वित्तीय तूट कशी कमी करणार?”, “केंद्रीय अर्थसंकल्प विकासाला कसा चालना देऊ शकतो?”, “कर आणि कर धोरणे”, “स्टार्टअप आणि संशोधनाला कसा वाव द्यायचा”, “शेती आणि इतर क्षेत्रातील अनुदानाला कसे हाताळायचे” असे अनेक प्रश्न चॅटजीपीटाला विचारण्यात आले. त्याचे उत्तर आपल्याला अमित परांजपे यांच्या ट्विटर हँडलवर सविस्तर वाचायला मिळेल.

Union Budget 2023 Live Updates: काय स्वस्त, काय महागणार? अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण कोणत्या घोषणा करणार? वाचा अर्थसंकल्पाशी निगडीत प्रत्येक अपडेट!

युजर्स म्हणाले, आता अर्थमंत्र्यांची काय गरज?

परांजपे यांनी चॅटजीपीटीने दिलेले उत्तर पोस्ट केल्यानंतर, युजर्सनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. योगेश उपाध्याय नावाचा युजर म्हणतो की, अर्थसंकल्पाबाबत ८० टक्के एकदम खरी तज्ञांची माहिती आहे. तर सुबोध मराठे नावाच्या युजरने म्हटले की, “आता आपल्याला अर्थमंत्र्यांची गरज आहे का? चॅटजीपीटीमुळे प्रत्येक क्षेत्रातील नोकरी काही वर्षांनी धोक्यात येईल.”