Union Budget 2024, Finance Minister Nirmala Sitharaman Speech Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा असून गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे. अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Union Budget 2024 Live Updates, Parliament Budget Session 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पातील तरतुदी…

11:28 (IST) 23 Jul 2024
Nirmala Sitharaman Union Budget LIVE Speech and Updates in Marathi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारमध्ये नव्या विद्यापीठाची घोषणा केली आहे. तसेच, अमृतसर-कोलकाता मार्गावर उद्योग कॉरिडोअर उभारण्यात येणार. विकास भी, विरासत भी या तत्वावर हे कॉरिडोर उभारलं जाणार – निर्मला सीतारमण

11:26 (IST) 23 Jul 2024
Finance Minister Nirmala Sitharaman Speech Live Updates:

देशभरात रस्तेबांधणीसाठी २६ हजार कोटींचा खर्च केला जाईल – निर्मला सीतारमण

11:19 (IST) 23 Jul 2024
Govt’s big push on employment-linked skilling

कौशल्यविकासासाठी केंद्र सरकारची नवीन योजना जाहीर. त्यात राज्य सरकार व उद्योगविश्वासोबत ही योजना राबवली जाईल. त्यात ५ वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योगविश्वाच्या गरजांनुसार तयार केला जाईल – निर्मला सीतारमण

11:18 (IST) 23 Jul 2024

५० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण केला जाईल – निर्मला सीतारमण

11:16 (IST) 23 Jul 2024
Finance Minister Nirmala Sitharaman Speech Live Updates: रोजगार व कौशल्यविकासासाठी…

यासाठी तीन योजना राबवल्या जातील. या योजना ईपीएफओमधील नोंदणीवर आधारित असतील.

१. पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना १ महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाईल. याचा फायदा २१ कोटी युवकांना होईल.

11:14 (IST) 23 Jul 2024
Budget 2024 Live: FM SItharaman on crop varieties for farmers

या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

11:13 (IST) 23 Jul 2024
Finance Minister Nirmala Sitharaman Speech Live Updates: शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासंदर्भात…

शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.

11:11 (IST) 23 Jul 2024
Budget 2024-2025 Live Updates:

अंतरिम अर्थसंकल्पात आम्ही वचन दिल्याप्रमाणे या अर्थसंकल्पात ९ घटकांव लक्ष केंद्रीत केलं जाईल..

१. शेती क्षेत्रातील उत्पादकता

२. रोजगार व कौशल्य विकास

३. मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय

४. उत्पादन व सेवा

५. शहरी विकास

६. उर्जा संरक्षण

७. पायाभूत संरचना

८. संशोधन व विकास

९. नव्या पीढीतील सुधारणा

11:08 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 live updates:

१.४८ लाख कोटी रुपये शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी ठेवण्यात आले आहेत – निर्मला सीतारमण

11:07 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 live updates:

या अर्थसंकल्पात आम्ही रोजगार, कौशल्य विकास, लघु-मध्यम उद्योग व मध्यम वर्गासाठी पाच वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत.

11:07 (IST) 23 Jul 2024
Budget 2024-2025 Live Updates:

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली. तिचा फायदा ८० कोटींहून अधिक लोकांना फायदा झाला.

11:06 (IST) 23 Jul 2024

गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केलं आहे – निर्मला सीतारमण

11:05 (IST) 23 Jul 2024

जागतिक पातळीवर राजकीय अस्थिरता, आर्थिक संदिग्धता, महागाई या बाबी दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताची आर्थिक प्रगती उल्लेखनीय ठरली आहे, भारतात महागाईचा जर ४ टक्क्यांच्या आसपास राहिला. तो सातत्याने कमी राहिला आहे – निर्मला सीतारमण

11:04 (IST) 23 Jul 2024

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशवासीयांचे मानले आभार

11:03 (IST) 23 Jul 2024
Finance Minister Nirmala Sitharaman Speech Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत दाखल

अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात…

11:03 (IST) 23 Jul 2024
Finance Minister Nirmala Sitharaman Speech Live Updates: थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात होणार

थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात होणार…

10:56 (IST) 23 Jul 2024
अर्थसंकल्पाबाबतचं क्विझ सोडवा आणि जिंका बक्षीसं

आपल्या देशाला अर्थसंकल्पाची मोठी परंपरा आहे. कुठल्या वर्षापासून अर्थसंकल्प सुरु झाला? ते पुढे काय काय बदल होत गेले? अर्थसंकल्पांची तारीख कुणी बदलली यासारखे प्रश्न तुमच्याही मनात असतील. त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत लोकसत्ता अर्थसंकल्पाचं खास क्विझ. आत्तापर्यंत तुम्ही जे अर्थसंकल्प पाहिले असतील, ज्या अर्थसंकल्पांबद्दल वाचलं असेल ते आठवा आणि सोडवा हे खास क्विझ लोकसत्ता ऑनलाईनतर्फे क्विझमधल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीसं मिळवण्यासाठी सज्ज व्हा.

बातमीची लिंक

08:23 (IST) 23 Jul 2024
आज सकाळी ११ वाजता सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प

आज सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात काय काय घोषणा होणार? प्राप्तिकराचा स्लॅब कसा असणार? सामान्यांना दिलासा मिळणार का? शेतकरी, महिला, बेरोजगार यांना काय काय मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. शिवाय रेल्वेसंदर्भातल्या, पायाभूत सुविधांसंदर्भातल्या तरतुदी काय असतील हे देखील समजणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

07:27 (IST) 23 Jul 2024
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी आधी काय काय घडणार?

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतील. आज सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपल्या निवासस्थानातून बाहेर पडतील आणि त्यानंतर अर्थमंत्रालयात पोहचतील. सकाळी ९ वाजता अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जी टीम होती त्या टीमसह फोटोसेशन केलं जाईल. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची मंजुरी घेण्यासाठी निर्मला सीतारमण या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी पोहचतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेत भारताचा अर्थसंकल्प सादर होईल.

06:48 (IST) 23 Jul 2024
Union Budget History : भारताच्या अर्थसंकल्पातील ‘या’दहा रंजक गोष्टी वाचा!

नव्या संसदेचं अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. पूर्ण वर्षभरासाठी हा अर्थसंकल्प म्हणजे रोडमॅप असतो. केंद्रीय अर्थसंकल्प हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात सरकारची आर्थिक रणनीती, प्राधान्यक्रम आणि वाढीच्या आकांक्षांची रूपरेषा दिली जाते. कर सुधारणा, पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि सामाजिक कल्याण वाटप केंद्रस्थानी आहेत. या दरम्यान भारताच्या अर्थसंकल्पाचे (Union Budget) काही महत्त्वाचे आणि रंजक पैलुहीआहेत. ते जाणून घेऊयात.

वाचा सविस्तर

Union Budget History Facts : सर्वाधिक लांबलचक भाषण ते ८०० शब्दांचा मसुदा; भारताच्या अर्थसंकल्पातील ‘या’ दहा रंजक गोष्टी माहिती आहेत का?

06:17 (IST) 23 Jul 2024
Union Budget 2024 : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटांत सूट मिळणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठरणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांनाही खूप अपेक्षा आहेत. रेल्वे तिकीटात पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना सूट दिली जायची, जी मधल्या काळात बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही सूट पुन्हा मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

वाचा सविस्तर

Union Budget 2024 : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटांत सूट मिळणार? वाचा अर्थसंकल्पात काय असेल?
06:00 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : पेट्रोल, डिझेलच्या दरासंदर्भात अर्थसंकल्पात दिलासा मिळणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी सकाळी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी संदर्भात काही मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भातही विचार केला जाऊ शकतो.

वाचा सविस्तर

History of Budget : भारतातील अर्थसंकल्पाचा इतिहास; स्वातंत्र्यपूर्व अन् नंतरच्या काळात नेमकं काय बदललं?

05:45 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : रेल्वेसाठी महत्वाची घोषणा करणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी सकाळी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामण देशातील रेल्वेच्या विभागासाठी काही महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

04:30 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : शेतीविषयी उपकरणांवरील जीएसटी कमी होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण या देशातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयी असलेल्या उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता आहे.

03:50 (IST) 23 Jul 2024

03:02 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : अर्थसंकल्पाच्या या गोष्टी माहितेयत का?

भारतीय संविधानाच्या कलम ११२ नुसार विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे महसूल आणि खर्चाचे आर्थिक विवरण करण्याचे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. दरवर्षी अर्थसंकल्प १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी तयार केला जातो आणि त्याचं वर्गीकरण महसूल बजेट आणि भांडवली बजेट असं केलं जातं. भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी सादर करण्यात आला होता. या पहिल्या अर्थसंकल्पापासून स्वतंत्र भारताच्या अर्थसंकल्पात अनेक बदल सातत्याने होत गेले.

02:18 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : पीएम शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार?

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार लाभार्ती शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मदत करत असतं. मात्र, आता या आर्थिक मदतीमध्ये आणखी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सहा हजार रुपयांऐवजी आठ हजारांपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण काही घोषणा करतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

01:47 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : अर्थसंकल्पात रोजगार वाढवण्यासंदर्भात भर देण्यात येणार?

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर करणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पामध्ये रोजगार वाढवण्यासंदर्भात भर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच महिला स्वयंरोजगारात वाढ करण्यासाठी काही सवलती दिल्या जाण्याची शक्यता आहे.

01:26 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : अर्थसंकल्पात रेल्वे, संरक्षण आणि बँकिंग क्षेत्रासाठी काय घोषणा होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प मंगळवारी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार आहेत. यामध्ये रेल्वे, संरक्षण आणि बँकिंग विभागासाठी काही महत्वाचे निर्णय हेण्याची शक्यता आहे.

01:09 (IST) 23 Jul 2024
union budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणत्या मोठ्या घोषणा कृषी क्षेत्रासाठी होतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काय मिळणार? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ लाइव्ह अपडेट्स / बजेट २०२४ लाइव्ह अपडेट्स