Health Care Budget 2024 Key Announcements: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी (२३ जुलै) आर्थिक वर्ष २०२४ चा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा (Union Budget For Health Care Sector 2024)

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने कॅन्सरच्या तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे, यामुळे कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरली जाणारी काही औषधे आणि उपकरणे स्वस्त होतील. याचा थेट फायदा रुग्णांना होण्याची अपेक्षा आहे. केंद्राने कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या आणखी तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे.

विशेष म्हणजे कॅन्सरची समस्या झपाट्याने वाढत असून त्यावर उपचार आणि औषधांवर होणाऱ्या खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. पण, अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आता काही प्रमाणात का होईना कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळू शकेल.

याशिवाय आरोग्य मंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम अंतर्गत वैद्यकीय एक्स-रे मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील बेसिक कस्टम ड्युटी (बीसीडी) मध्ये तपशीलवार बदलदेखील केले.

हे उपाय वैद्यकीय क्षेत्रातील स्थानिक उत्पादन आणि नवोपक्रमांना समर्थन देत आरोग्य सेवा परवडणारी आणि सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली.

फेब्रुवारी २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान सीतारमण यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश करण्यासाठी आरोग्य सेवा कव्हरेज वाढवण्याची घोषणा केली. लसीकरण आणि मिशन इंद्रधनुष व्यवस्थापित करण्यासाठी U-WIN व्यासपीठ देशभरात आणले.

सीतारमण यांनी भारतातील ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध लसीकरण करण्यास प्रोत्साहन दिले.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2024 nirmala sitharaman exempts basic custom duty for 3 more cancer medicines sjr
Show comments