Agriculture Sector Union Budget 2024 Announcement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी निधींची घोषणा केली. तसेच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी १.५२ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येत असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?

आमच्या सरकारने कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होणार आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले. तसेच शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार असून त्यामाध्यमातून देशभरातील ४०० जिल्ह्यामध्ये खरीप पिकांचं सर्वेक्षण आणि मातीची तपासणी केली जोईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल, असंही निर्माला सीतारमण म्हणाल्या.

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…

हेही वाचा – Union Budget 2024 Speech Live Updates: मोबाईल फोन स्वस्त होणार; PCBS व चार्जरवरील BCD १५ टक्क्यांनी घटवला!

१ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन

पुढे बोलताना त्यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचल्याचीही घोषणा केली. आगामी दोन वर्षात आम्ही नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढच्या दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासााठी प्रोत्साहन दिलं जाईल, तसेच त्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारली जातील, अशी माहितीही निर्मला सीतारमण यांनी दिली.

शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड

अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना, अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड देण्याचीही घोषण केली. केंद्र सरकारद्वारे पाच राज्यात जन समर्थ आधारीत किसान क्रेडीट कार्ड जारी केले जाईल, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Budget 2024-2025 : EPFO मध्ये नव्यानेच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त भत्ता, निर्मला सीतारमण यांनी कोणती घोषणा केली?

न्यूक्लियस ब्रीडिंग सेंटरसाठी आर्थिक मदत

झिंगे आणि माशांच्या ब्रूडस्टॉकसाठी न्यूक्लियस ब्रीडिंग सेंटरचे नेटवर्क उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल, अशी माहितीही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

हेही वाचा – Budget 2024: शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी अर्थसंकल्पात १.४८ लाख कोटींची तरतूद…

ग्राम सडक योजनाचे चौथा टप्पा

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकारने पावलं उचचली असून देशभरातील २५ हजार गावखेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजने चौथा टप्पा सुरु करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.