History of Share Market on Budget Day : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत आज (२३ जुलै) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २०१४ साली पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारावर अनेकांच्या नजरा असतात. त्यामुळे शेअर बाजारात मागच्या दहा वर्षात काय घडामोडी घडल्या होत्या, यावर एक नजर टाकू.

अर्थसंकल्प सादर होताना बऱ्याचदा दिसून आले आहे की, अर्थसंकल्पाचे भाषण सुरू होताच शेअर बाजार वर गेला. मात्र अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. मागच्या दहा वर्षात नेमकी परिस्थिती काय होती? हे पाहू

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
Vishal Mega Mart IPO
Vishal Mega Mart IPO Date : तुफान कमाई करून देणार ८,००० कोटींचा हा आयपीओ; पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती….
how to tackle food inflation causes of food inflation measures to control food inflation
अन्नधान्याची महागाई रोखणार कशी?
sensex jump 110 points to settle at 80956 nifty gained 10 points to end at 24467
खासगी बँकांतील तेजीने ‘सेन्सेक्स’ची शतकी कमाई

२०१४ साली अर्थसंकल्पानंतर बाजारात घसरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ साली पहिलाच अर्थसंकल्प सादर केला होता. तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी १० जुलै रोजी संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या. वैयक्तिक करदात्यांसाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढवली. मात्र त्या दिवशी शेअर बाजारात फार उत्साह दिसला नाही. सेन्सेक्स ०.२८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

हे वाचा >> Union Budget 2024 : कसा असेल अर्थसंकल्प? निर्मला सीतारामण कधी पोहचणार संसदेत? जाणून घ्या हे मुद्दे

२०१५ साली शेअर बाजारात तेजी

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारी यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी वित्तीय तूट (फिस्कल डेफिसिट) ३.९ टक्क्यांवर रोखण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. केंद्र सरकारने तूट रोखण्यासाठी जे धोरण आखले, ते पाहता शेअर बाजाराने सकारात्मत प्रतिक्रिया दिली. यामुळे सेन्सेक्स ०.४८ टक्क्यांनी वाढला.

२०१६ साली शेअर बाजारात मंदी दिसली

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २९ फेब्रुवारी रोजी तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. तसेच वित्तीय तुटीला ३.५ टक्क्यांवर रोखण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. मात्र शेअर बाजाराला वित्तीय तुटीचे हे लक्ष्य फारसे रुचले नाही आणि त्यादिवशी सेन्सेक्समध्ये ०.६६ टक्क्यांची तूट पाहायला मिळाली.

हे ही वाचा >> Budget 2024 Expectations : मोबाइल स्वस्त होणार का? आजच्या अर्थसंकल्पाआधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरासंबंधी माहिती घ्या

शेअर बाजारात २०१७ मध्ये जोरदार तेजी

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. यावेळी शेतकरी, युवक आणि समाजातील विविध उपेक्षित घटकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. यावेळी वित्तीय तुटीचे लक्ष्य केवळ ३ टक्के राखण्याचे आवाहन केले. शेअर बाजाराला हा अर्थसंकल्प रुचला आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स १.७६ टक्क्यांनी तेजी घेत बंद झाला.

२०१८ साली घसरण

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी रोजी पाचवा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी MSME, रोजगार निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. वित्तीय तुटीचे लक्ष्य ३.३ टक्के ठेवण्यात आले. मात्र शेअर बाजारात निराशा दिसली आणि त्यादिवशी सेन्सेक्स ०.१६ टक्क्यांची थोड्याशा घसरणीसह बंद झाला.

२०१९ साली पूर्ण अर्थसंकल्प मांडल्यानंतर घसरण

२०१९ साली लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकत पंतप्रधान मोदी यांनी भक्कम सरकार स्थापन केले. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जुलै रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्याआधी १ फेब्रुवारी रोजी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेअर बाजारावर फारसा सकारात्मक परिणाम दिसला नाही. त्यादिवशी बाजारात ०.९९ टक्क्यांची घसरण दिसली.

२०२० साली मोठी घसरण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२०-२१ चा संपूर्ण अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला. मात्र अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांना आकर्षित करण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला. करोनामुळे अर्थव्यवस्था आधीच मरगळलेली होती. अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात २.४३ टक्क्यांची घट पाहायला मिळाली.

२०२१ साली शेअर बाजारात उसळी

करोना ओसरल्यानंतर २०२१ साली निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी केलेले भाषण अनेकांना आवडले. भाषण सुरू होताच सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. पूर्ण दिवस बाजारात तेजी राहिली. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्समध्ये ५ टक्क्यांची तेजी दिसली

२०२२ साली पुन्हा तेजी

२०२२-२३ या आर्थिक वर्षातही निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. तसेच करोनामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये १.३६ टक्क्यांची वाढ होऊन बाजार बंद झाला.

२०२३ साली संमिश्र प्रतिसाद

१ फेब्रुवारी २०२३ साली सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराने संमिश्र प्रतिसाद दिला. शेअर बाजारात दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात वर-खाली झालेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स ०.२७ टक्क्यांची वाढ घेऊन बंद झाला तर निफ्टीने लाल निशाण दाखविले.

२०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर काय झाले?

१ फेब्रुवारी २०२४ साली निर्मला सीतारमण यांनी निवडणुकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ०.१५ टक्क्यांची घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीमध्येही ०.१३ टक्क्यांची घसरण झाली.

Story img Loader