केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, संरक्षण विभाग, युवा, कृषी, शिक्षण क्षेत्रासह आदी महत्वाच्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर भारताकडून सगळ्यात जास्त कुठल्या देशाला मदत मिळते? याची माहितीही बजेटमधून समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने सर्वाधिक मदत भूतानला दिल्याचे दिसून येत आहे.

२०२३-२४ च्या सुधारित अंदाजानुसार, भारताने परदेशी सरकारांना ६,५४१ कोटी रुपये दिले. २०२३-२४ मध्ये ही रक्कम ५,८४८ कोटी रुपये होती. दरम्यान, आता २०२४-२५ च्या अर्थसंकल्पानुसार, भारताकडून भूतानला सर्वाधिक २,०६८.५६ कोटी रुपयांची मदत मिळण्याचा अंदाज आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २,४०० कोटींपेक्षा कमी आहे.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा

हेही वाचा : Budget 2024 : विदेशी वित्त संस्था पळ काढत असताना भारतीय संस्थांनी सावरला शेअर बाजार

दरम्यान, भूताननंतर नेपाळला जास्तीत जास्त मदत दिली जाईल. माहितीनुसार, भारत आणि मालदीवला गेल्या वर्षी प्रमाणेच ४०० कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात ही रक्कम ७७०.९० कोटी रुपये होती. भूतान, नेपाळ आणि मालदीव व्यतिरिक्त भारत इतर अनेक देशांना मदत करेल. यामध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि लॅटिन अमेरिकन देशांचा समावेश आहे. यामध्ये कोणत्या देशाला किती मदत दिली जाईल, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

भारताकडून मदत घेणारे देश कोणते?

भूतान : २,०६८.५६ कोटी
नेपाळ : ७०० कोटी
मॉरिशस : ३७० कोटी
म्यानमार : २५० कोटी
अफगाणिस्तान : २०० कोटी
आफ्रिकन देश : २०० कोटी
मालदीव : ४०० कोटी
श्रीलंका : २४५ कोटी
बांगलादेश : १२० कोटी
लॅटिन अमेरिकन देश: ३० कोटी
सेशेल्स : ४० कोटी

वित्तीय तूट कमी करण्याचं लक्ष्य

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय तूट कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. जीडीपीच्याच्या ४.९4. टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, हे १ फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेटमध्ये घोषित केलेल्या ५.१ टक्के लक्ष्यापेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष २०२३ -२४ साठी, प्रारंभिक वित्तीय तुटीचे लक्ष्य जीडीपीच्याच्या ५.९ टक्के होते. नंतर सुधारित करून ५.८ टक्के करण्यात आले.