India Budget 2025 Live Updates: २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाप्रणीत एनडीएला मतदारांनी काठावर का होईना, पास केलं आणि केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन झालं. पण त्यानंतर महाराष्ट्रासह झालेल्या इतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारत दमदार विजय मिळवले. त्यानंतर सादर होणारा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असून त्यामध्ये भाजपानं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता दिसणार की विरोधकांच्या टीकेला इंधन मिळणार? याकडे राजकीय वर्तुळासोबतच देशभरातील करदात्यांचंही लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025: सकाळी ११ वाजता निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला होणार सुरुवात

01:04 (IST) 1 Feb 2025

FM Nirmala Sitharaman budget 2025 Speech Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर विक्रम!

देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात आजतागायत अनेक केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केले. मात्र, आजपर्यंत सर्वाधिक काळ म्हणजेच २ तास ४२ मिनिटं भाषण करण्याचा विक्रम विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे.

00:05 (IST) 1 Feb 2025

Union Budget 2025 Live Updates in Marathi: १९७३ साली सादर झाला होता देशातला ‘काळा अर्थसंकल्प’

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९७३ साली सादर केलेला अर्थसंकल्प ‘ब्लॅक बजेट’ अर्थात ‘काळा अर्थसंकल्प’ गणला गेला होता. या अर्थसंकल्पात तब्बल ५५० कोटींची वित्तीय तूट दर्शवण्यात आली होती.

23:17 (IST) 31 Jan 2025

India Budget 2025 Live Updates: देशाच्या इतिहासातलं सर्वात कमी शब्दसंख्या असणारं बजेट

१९७७ साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री हिरूभाई पटेल यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी शब्दसंख्या असणारा अर्थसंकल्प ठरला आहे. हिरूभाई पटेल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शब्द होते ८००!

22:51 (IST) 31 Jan 2025

How will Union Budget 2025 affect taxpayers? करदात्यांसाठी नवा स्लॅब जाहीर होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता २५ लाखांपर्यंतच्या उत्पनाचा नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा चालू आहे.

वाचा सविस्तर

22:50 (IST) 31 Jan 2025

How will Union Budget 2025 affect taxpayers? करपात्र उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढणार?

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करपात्र उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा सविस्तर

22:44 (IST) 31 Jan 2025

Union Budget 2025 Live Updates in Marathi: आर्थिक पाहणी अहवालातील निष्कर्षांचा नेमका अर्थ काय?

मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची देशाच्या आर्थिक पाहणी अहवालावर प्रतिक्रिया…

22:42 (IST) 31 Jan 2025

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…

अपुऱ्या अभ्यासाअभावी शेअर बाजारात उतरलेल्या आणि ट्रेडिंगमुळे अल्पकाळात भरपूर पैसा कमावता येतो असा विचार करणाऱ्या नवीन पिढीतील गुंतवणूकदारांनी सावधपणे याकडे लक्ष दिले पाहिजे.

वाचा सविस्तर

22:41 (IST) 31 Jan 2025

Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates: केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा अर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर

Economic Survey FY 2025-26 : या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर हा ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

वाचा सविस्तर

22:39 (IST) 31 Jan 2025

FM Nirmala Sitharaman Speech Live Updates: कधी सुरू होणार निर्मला सीतारमण यांचं भाषण?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.

https://twitter.com/ANI/status/1885351793582104828

अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून वार्षिक दस्तऐवज सादर केले जातात. (PC : Nirmala Sitharaman FB, Freepik)

Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025: निर्मला सीतारमण यांचा केंद्री अर्थमंत्री म्हणून सलग आठवा अर्थसंकल्प!