India Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात नव्या करप्रणालीची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही त्यांनी बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून हा अर्थसंकल्प म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या घोषणा असल्याची टीका केली जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील राहुल गांधींच्या विधानावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “काँग्रेसने या अर्थसंकल्पावर अजिबात टीका करू नये, त्यांनी मध्यमवर्गाला किती दिलासा मिळाला आहे ते पाहिले पाहिजे. आपल्या देशावर ६० वर्षे राज्य केल्यानंतरही, ते आयकर सवलत स्लॅब ५ लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवू शकले नाहीत. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केवळ मध्यमवर्गालाच नाही तर ननिम्न मध्यम वर्ग आणि उच्च मध्यमवर्गीयांनाही सूट दिली आहे.”
Union Budget 2025 Highlights, 1 February 2025: अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठीच्या घोषणांचा समावेश
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत
यंदाचं केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरु झालं असून पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पार पडेल.
Union Budget 2025 Live Updates: भारतातील कररचनेत बदल होणार?
सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पन्नाच्या मर्यादेनुसार जुनी व नवीन करप्रणाली अस्तित्वात आहे. करदात्यांना त्यांच्या नियोजनानुसार यातील कोणतीही एक पद्धती निवडून त्यानुसार करभरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Union Budget 2025 Live Updates in Marathi: यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या आधी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा अर्थसंकल्पाबाबत सूचक शब्दांत भाष्य केलं. “मी लक्ष्मीमातेला नमस्कार करतो. आपल्या संस्कृतीत अशा प्रसंगी देवी लक्ष्मीचं स्मरण केलं जातं, तिला नमन केलं जातं. मी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करतो की देशातील गरीब व मध्यमवर्गावर तिची कृपादृष्टी राहो”. मोदींच्या या वक्तव्याचा कराशी (टॅक्स) संबंध जोडला जात आहे.
India Budget 2025 Live Updates: आधी २८ फेब्रुवारी रोजी सादर व्हायचा अर्थसंकल्प
स्वातंत्र्यानंतर भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर व्हायचा. पण २०१७ सालापासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होऊ लागला.
FM Nirmala Sitharaman budget 2025 Speech Live Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर विक्रम!
देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात आजतागायत अनेक केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केले. मात्र, आजपर्यंत सर्वाधिक काळ म्हणजेच २ तास ४२ मिनिटं भाषण करण्याचा विक्रम विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे.
Union Budget 2025 Live Updates in Marathi: १९७३ साली सादर झाला होता देशातला ‘काळा अर्थसंकल्प’
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९७३ साली सादर केलेला अर्थसंकल्प ‘ब्लॅक बजेट’ अर्थात ‘काळा अर्थसंकल्प’ गणला गेला होता. या अर्थसंकल्पात तब्बल ५५० कोटींची वित्तीय तूट दर्शवण्यात आली होती.
India Budget 2025 Live Updates: देशाच्या इतिहासातलं सर्वात कमी शब्दसंख्या असणारं बजेट
१९७७ साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री हिरूभाई पटेल यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी शब्दसंख्या असणारा अर्थसंकल्प ठरला आहे. हिरूभाई पटेल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शब्द होते ८००!
How will Union Budget 2025 affect taxpayers? करदात्यांसाठी नवा स्लॅब जाहीर होणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता २५ लाखांपर्यंतच्या उत्पनाचा नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा चालू आहे.
How will Union Budget 2025 affect taxpayers? करपात्र उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढणार?
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करपात्र उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Union Budget 2025 Live Updates in Marathi: आर्थिक पाहणी अहवालातील निष्कर्षांचा नेमका अर्थ काय?
मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची देशाच्या आर्थिक पाहणी अहवालावर प्रतिक्रिया…
#WATCH | Delhi | On economic growth, Chief Economic Advisor, Dr V. Anantha Nageswaran says, "The growth projections that we have given take into account the global environment today, which is quite uncertain, which is evolving and it is not settled yet…Even if you are able to… pic.twitter.com/BqT77Ll9qa
— ANI (@ANI) January 31, 2025
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
अपुऱ्या अभ्यासाअभावी शेअर बाजारात उतरलेल्या आणि ट्रेडिंगमुळे अल्पकाळात भरपूर पैसा कमावता येतो असा विचार करणाऱ्या नवीन पिढीतील गुंतवणूकदारांनी सावधपणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates: केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा अर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर
Economic Survey FY 2025-26 : या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर हा ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
FM Nirmala Sitharaman Speech Live Updates: कधी सुरू होणार निर्मला सीतारमण यांचं भाषण?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून वार्षिक दस्तऐवज सादर केले जातात. (PC : Nirmala Sitharaman FB, Freepik)