Union Budget आपल्या देशाला अर्थसंकल्पाची मोठी परंपरा आहे. कुठल्या वर्षापासून अर्थसंकल्प सुरु झाला? ते पुढे काय काय बदल होत गेले? अर्थसंकल्पांची तारीख कुणी बदलली यासारखे प्रश्न तुमच्याही मनात असतील. त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत लोकसत्ता अर्थसंकल्पाचं खास क्विझ. आत्तापर्यंत तुम्ही जे अर्थसंकल्प पाहिले असतील, ज्या अर्थसंकल्पांबद्दल वाचलं असेल ते आठवा आणि सोडवा हे खास क्विझ लोकसत्ता ऑनलाईनतर्फे क्विझमधल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीसं मिळवण्यासाठी सज्ज व्हा.

कलम ११२ नुसार सादर केला जातो अर्थसंकल्प (Union Budget)

भारतीय संविधानाच्या कलम ११२ नुसार विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे महसूल आणि खर्चाचे आर्थिक विवरण करण्याचे केंद्रीय अर्थसंकल्प Union Budget सादर केला जातो. दरवर्षी अर्थसंकल्प १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी तयार केला जातो आणि त्याचं वर्गीकरण महसूल बजेट आणि भांडवली बजेट असं केलं जातं.

lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
mpsc mantra loksatta
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा – प्राकृतिक भूगोल
Ganesh Chaturthi 2024 Quiz
Ganesh Chaturthi 2024: आपल्या लाडक्या गणपती बाप्पांविषयी तुम्हाला किती माहिती आहे? या प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीस जिंका!
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?
KBC 16 Nareshi Meena
KBC: एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर स्पर्धक अडकली; तुम्हाला माहितीये या प्रश्नाचे उत्तर
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित मुख्य परीक्षा – सामान्य विज्ञान
Narendra modi Ukraine visit latest marathi news
विश्लेषण: मोदी यांची युक्रेन भेट… अजेंडा काय, अपेक्षा काय? मध्यस्थीची शक्यता किती?
Budget 2024 Expectations on Taxation
24 Expectations on Taxation: आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Union Budget ची वेळ कशी बदलली?

१९२४ पासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. अधिकाऱ्यांना आराम मिळावा म्हणून ही वेळ निश्चित केल्याचे सांगितले जाते. तसेच ब्रिटनमध्ये सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर व्हायचा. त्यानंतर भारतात संध्याकाळी अर्थसंकल्प सादर केला जायचा. भारतावर ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे आधी ब्रिटनचा अर्थसंकल्प उरकून घेतला जायचा. त्यामुळेच संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे अर्थसंकल्प सादर केला जात असे. १९९९ पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या तारखेला अर्थसंकल्प सादर केला जात होता. ब्रिटिश भारतातून गेले तरीही त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थेनुसारच प्रशासन तयारी करत होते. याल ब्रिटिश परंपरेला पहिल्यांदा फाटा दिला तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी.

हे पण वाचा- Union Budget 2024 : कसा असेल अर्थसंकल्प? निर्मला सीतारामण कधी पोहचणार संसदेत? जाणून घ्या हे मुद्दे

कुणी सुरु केली सकाळी ११ वाजता Union Budget वाचण्याची परंपरा?

१९९९ साली यशवंत सिन्हा यांनी संध्याकाळी अर्थसंकल्प मांडण्याऐवजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडण्याची एक नवी परंपरा सुरू केली. आता अर्थसंकल्प आज सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. त्याआधी ही क्विझ सोडवा आणि डोक्याला चालना देऊन उत्तरं बरोबर आल्यास बक्षीसं जिंका.