भारतातील कोट्यवधी सामान्य लोक नोकरी किंवा रोजंदारीवर काम करतात. महिन्याकाठी खर्चाचा ताळेबंद करता करता अनेकांच्या नाकी नऊ येतात. मग विचार करा देशाचा संपूर्ण वर्षभराचा ताळेबंद म्हणजेच अर्थसकंल्प (Budget 2023) बनवणे, हे किती मोठे आव्हान असेल? देशाच्या सर्व गरजा पूर्ण करणे, विविध मंत्रालय आणि राज्याच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद करणे, हे सोपे काम नाही. ही एक मोठी आणि किचकट प्रक्रिया असते. केंद्रीय अर्थ मंत्रालयतर्फे ही किचकट प्रक्रिया पूर्ण करुन अर्थमंत्र्यांच्या ताब्यात अर्थसंकल्पाची प्रत देतात. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजधानी दिल्लीत संसद भवनाच्या समोरुन एक रस्ता रायसीना हिलकडे जातो. १९२९ रोजी रायसीना हिलची निर्मिती झाली. याच ठिकाणी नॉर्थ ब्लॉक नावाच्या इमारतीला भारताचे अर्थ मंत्रालय म्हणूनही ओळखले जाते. देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे, हे या इमारतीमधील अधिकाऱ्यांचे मुख्य काम आहे. भारताचा अर्थसंकल्प तयार करण्यात अनेक अर्थतज्ज्ञ, अर्थ विषयक जाणकार आणि इतर विशेषज्ञांची देखील महत्त्वाची भूमिका असते.
कसा तयार होतो अर्थसंकल्प?
अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाची भूमिका अर्थ सचिवांची असते. राजस्व सचिव आणि इतर सचिव यामध्ये योगदान देतात. अर्थसंकल्प तयार होत असताना अनेकवेळा अर्थमंत्र्यांसोबत चर्चा केली जाते. अनेकवेळा रात्री उशीरापर्यंत बैठका चालतात. नॉर्थ ब्लॉक पासून ते अर्थमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत बैठकांचे सत्र चालत असते. अर्थसंकल्प बनण्याच्या काळात अर्थ सचिव अनेकवेळा पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्याशी सल्लामसलत करुन निर्णय घेतात. अर्थसंकल्पाआधी अनेक वेळा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांची उजळणी केली जाते. तसेच इतर मंत्रालयांचे सचिव, सरकारी संस्था जसे की, नीती आयोग, राष्ट्रीय सल्लागार परिषद यामध्ये काम करणाऱ्या सदस्यांचाही विचार, मत लक्षात घेतले जाते.
अर्थसंकल्प तयार करणे एक गोपनीय प्रक्रिया
अर्थसंकल्प बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया ही गोपनीय राखली जाते. अर्थसंकल्पाशी निगडीत काही चर्चाविनिमय इतर विभागाशी केला गेला तरी अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद असणार याची माहिती फक्त अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमलाच असते. याव्यतिरिक्त याची माहिती फक्त पंतप्रधानांना दिली जाते. अर्थसंकल्प बनविण्याच्या शेवटच्या काही दिवसात तर अर्थसंकल्पासाठी काम करणारे अधिकारी घरी देखील जात नाहीत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि प्रक्रिया गोपनीय ठेवण्यासाठी यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचा काही दिवसांसाठी बाहेरील जगाशी संपर्क तोडण्यात येतो. त्यांना मोबाईल बाळगण्याची मुभा नसते. याकाळात सामान्य लोक नॉर्थ ब्लॉकच्या आजूबाजूला देखील फिरकू शकत नाहीत, एवढा बंदोबस्त त्याठिकाणी लावला जातो.
याआधी दरवेळी २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जायचा. तेव्हा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत अर्थसंकल्प तयार करण्याची लगबग सुरु असायची. अर्थसंकल्प नॉर्थ ब्लॉकच्या ज्या खोलीत ठेवला जातो, त्या खोलीची सुरक्षा अभेद्य असते.
अर्थसंकल्पाशी निगडीत काही महत्त्वाचे मुद्दे
- सर्वसाधारण अर्थसंकल्पात केंद्राची सर्वच मंत्रालये आणि विभागांशी निगडीत वर्षभराच्या खर्चाचे विवरण पत्र असते.
- कोणकोणत्या योजनांवर वर्षभरात किती खर्च करायचा आहे, याची माहिती अर्थसंकल्पात दिली जाते.
- अर्थसंकल्पात १ एप्रिल ते पुढच्या वर्षीच्या ३१ मार्च पर्यंतचा आर्थिक विषयाचा लेखाजोखा असतो.
- याआधी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडला जात होता. मात्र १ एप्रिल २०१७ पासून रेल्वेचाही अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात अंतर्भूत करण्यात आला आहे.
कधी सादर होईल अर्थसंकल्प?
१ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. फार पुर्वीपासून अर्थसंकल्प संसदेत संध्याकाळी पाच वाजता सादर केला जात होता. कारण आपल्यावर अनेकवर्ष ब्रिटिशांची सत्ता होती. स्वातंत्र्यपुर्व काळात भारतीय अर्थसंकल्प आधी ब्रिटनच्या संसदेत सादर केला जायचा आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता भारतीय संसदेत मांडला जायचा. २००१ साली एनडीएचे सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिंह यांनी वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रथा बंद केली आणि सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात केली.
याच्याही पुढे जात मोदी सरकारने अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीत आणखी एक बदल केला. मोदींनी अर्थसंकल्प सादर करण्याची १ फेब्रुवारी ही तारीख ठरवली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पावर चर्चा करायला वेळही मिळतो.