What gets cheaper, what gets expensive in Union budget 2025 Full List: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर करत असताना सीमा शुल्कात बरेच बदल केले आहेत, ज्याचा फायदा औषधे ते औद्योगिक वस्तूंपासून अनेक क्षेत्रांना होणार आहे. २०२४ साली सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात १० क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. शेती, उत्पादन, रोजगार, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे.
कोणत्या क्षेत्रातील वस्तू स्वस्त होणार?
- सरकारने ३६ पेक्षा अधिक जीवनावश्यक औषधांवरील मुलभूत सीमा शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोग आणि इतर दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ३६ औषधांवरील मुलभूत सीमा शुल्कात सूट देण्याचा प्रस्ताव आहे.
- केंद्र सरकारने कोबाल्ट उत्पादने, LED, झिंक, लिथियम-आयन बॅटरी स्क्रॅपवरील सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- जहाजांच्या बांधणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर आणखी १० वर्षांसाठी सीमा शुल्क माफ करण्यात आले आहे.
- फ्रोझन फिश पेस्टवरील सीमा शुल्क ३० टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
- हस्तकला बाजारपेठेला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे.
- निळ्या चामड्याला सीमा शुल्कातून सूट देण्यात येणार आहे, यामुळे चामड्याच्या उद्योगाला चालना मिळेल.
- इथरनेट स्विचेसचे कॅरीअर ग्रेड
- १२ प्रकारची खनिजे
- ओपन सेल (पेशी)
- सागरी उत्पादने
या क्षेत्रातील वस्तू महाग होण्याची शक्यता
- इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात येणार आहे. यामुळे फ्लॅट टीव्हीसारख्या वस्तूंची किंमत वाढेल.
- विणलेले कपडे