आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला लगेचच श्रीमंत व्हायचं असतं. बँक एफडी, एलआयसी, पोस्ट ऑफिस हे जोखीममुक्त गुंतवणुकीचे पर्याय आहेत, परंतु त्यात परतावा थोडा कमी मिळतो. त्यामुळे लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला खूप आवडते. म्युच्युअल फंडात छोटी एसआयपी करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ सुधारायचा असेल, तर म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगत आहोत, ज्याने गेल्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १०,००० च्या SIP वर १० लाखांपेक्षा जास्त फायदा दिला आहे. हा म्युच्युअल फंड म्हणजे क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन (Quant Small Cap Fund Direct Plan)आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळाला

अनेक आर्थिक तज्ज्ञ लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात. क्वांट स्मॉल कॅप फंडाने थेट योजनेंतर्गत गेल्या ३ वर्षांत गुंतवणूकदारांना ६४.५% परतावा दिला आहे. या फंडातील १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक तीन वर्षांत सुमारे १०.९ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. यातील आणखी एका दुसऱ्या योजनेने तीन वर्षांत ६२.१९ टक्के परतावा दिला आहे. यामुळे १०,००० रुपयांची मासिक एसआयपी अंदाजे १०.४ लाख रुपयांपर्यंत वाढते.

हेही वाचाः आता तुम्हालाही UPI द्वारे EMI भरता येणार, ‘या’ बँकेने सुरू केली नवी सुविधा; कशी वापरायची ते जाणून घ्या

टॉप शेअर होल्डिंग्स

एप्रिल २०२३ च्या फंडाच्या शेअरसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज, ITC, HDFC बँक, जिंदाल स्टेनलेस, RBL बँक, IRB इन्फ्रास्ट्रक्चर, पंजाब नॅशनल बँक, बिकाजी फूड्स इंटरनॅशनल, उषा मार्टिन आणि जस्ट डायल या स्मॉल कॅप फंडाकडील टॉप १० शेअर होल्डिंग्स आहेत. क्वांट स्मॉल कॅप प्लॅनने १५.३% भांडवल बँकांना दिले आहे, त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने (६.५२%), फार्मास्युटिकल्स (५.८६%) आणि बांधकाम (५.७८%) आहेत.

हेही वाचाः काही मुख्यमंत्री करोडपती तर काही लखपती; जाणून घ्या एकाच क्लिकवर संपूर्ण यादी

Story img Loader