गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिझनेस टुडे आणि टॅगगड यांनी ऑनलाइन सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणादरम्यान भारतातील विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात ३२,००० कर्मचार्‍यांचा समावेश होता, तर यावर्षी ३५,००० हून अधिक लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. सर्वेक्षणानंतर सुमारे २५ कंपन्यांची यादी तयार करण्यात आली असून, या कंपन्यांमध्ये प्रत्येकाला काम करण्याची इच्छा आहे. लोकांनी या कंपन्यांना भारतात काम करण्यासाठी सर्वोत्तम म्हणून रेटिंग दिले आहे. या यादीनुसार, TCS पहिल्या स्थानावर आहे.

TCS ने गेल्या आर्थिक वर्षात ४४,००० कॅम्पस भरती केल्या

TCS ही देशातील सर्वात मोठी IT कंपनी आहे. लवकरच कंपनी कॅम्पस रिक्रूटसाठीही एक मोठे पाऊल उचलणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांवरही दबाव वाढणार आहे. यासोबतच कंपनी कॅम्पस रिक्रूटसाठी बेस सॅलरी वाढवण्याचा विचार करीत आहे. IT क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या कमी होत आहे, परंतु TCS ने गेल्या आर्थिक वर्षात ४४,००० कॅम्पस भरती केल्या आहेत. या वर्षी कॅम्पसमधून ४०,००० लोकांना भरती करण्याची कंपनीची योजना आहे.

Google Amazon Microsoft Meta Other Tech Companies Have Cut Jobs
२०२५ मध्ये टेक कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ? कारण काय? गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये का सुरू आहे नोकर कपात?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rose farming in water-scarce areas like Kalas in Indapur taluka
कळसच्या माळरानावर फुलतोय, फुलांचा राजा ‘गुलाब’
All about the Indian Forest Service
नोकरीची संधी
india become world s largest exporter of agrochemicals
कृषी रसायनांचा भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार; जाणून घ्या, जागतिक बाजारपेठेत किती वाटा
Zomato CEO makes new revelation regarding recruitment of Chief of Staff
‘चिफ ऑफ स्टाफ’च्या भरतीबाबत झोमॅटोच्या सीईओनी केला नवा खुलासा! वाचा काय म्हणाले दीपिंदर गोयल?
India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
114 junior engineers in the mumbai municipal corporation will get promotion
महापालिकेतील ११४ कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती होणार

हेही वाचाः FD Interest : LIC च्या FDमधून नफा मिळवण्याची संधी, ७.७५ टक्क्यांपर्यंत मिळतेय व्याज

दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर कोणत्या कंपन्या?

या यादीत दुसरे नाव भारतातील Accenture चे आले आहे. आयसीआयसीआय बँकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ICICI बँक ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. आरबीआयने २०१५ आणि २०१६ मध्ये ICICI बँकेला D-SIB म्हणून घोषित केले होते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या बँका देशातील सर्वात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक आहेत, ज्यांना बुडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. या यादीतील कोणतीही बँक तोट्यात गेल्यास देशाच्या आर्थिक सेवांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था वाईट अवस्थेला पोहोचू शकते.

हेही वाचाः विश्लेषण: आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण कशामुळे झाली?

टॉप २५ कंपन्यांची यादी पाहा

यात Google India, HDFC bank, Amazon India, Axis Bank, Infosys, Wipro, Abbott India, Deloitte India, Tata Steel, Microsoft, SBI, Tata Motors, JP Morgan Chase, Mahindra & Mahindra, SKF India, IBM, Bosch, Tata Advanced Systems , Capgemini India, Cognizant Technology Solutions India, Apollo Health & Lifestyle आणि HCL Technologies यांचा समावेश आहे.

Story img Loader