भारतातील अब्जाधीशांच्या शर्यतीत पुरुषांबरोबरच महिलाही पुढे आहेत. देशातील अनेक अब्जाधीश महिलांनी त्यांच्या व्यवसायातून विशेष ओळख आणि दर्जा मिळवला आहे. फोर्ब्स इंडिया या लोकप्रिय व्यावसायिक मासिकाने दरवर्षीप्रमाणे ४ एप्रिल २०२३ रोजी अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत देशातील १६ नवीन अब्जाधीशांचा समावेश झाला असून, त्यापैकी ३ महिला आहेत. फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार, भारतातील ५ श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल, रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, लीना तिवारी आणि विनोद राय गुप्ता यांचा समावेश आहे. या यादीनुसार विनोद राय गुप्ता या देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. विनोद राय गुप्ता कोण आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय आहे? हे जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॅवेल्स इंडियाच्या संस्थापकाची पत्नी

विनोद राय गुप्ता या हॅवेल्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांच्या आई आणि किंमत राय गुप्ता यांच्या पत्नी आहेत. फोर्ब्सनुसार, ७८ वर्षीय विनोद राय गुप्ता यांची एकूण संपत्ती ३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि या आकडेवारीसह त्या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. हॅवेल्स इंडियाची स्थापना १९५८ मध्ये विनोद राय गुप्ता यांचे दिवंगत पती किमा राय गुप्ता यांनी केली होती. आता अनिल राय गुप्ता कंपनीचे कामकाज पाहतात. हॅवेल्सची स्थापना इलेक्ट्रिकल्स ट्रेडिंग व्यवसाय म्हणून झाली. कंपनी पंखे, रेफ्रिजरेटर, एसी आणि वॉशिंग मशिनपासून सर्वकाही तयार करते. हॅवेल्सचे १४ कारखाने असून, त्यांची उत्पादने ५० हून अधिक देशांमध्ये विकली जातात.

हेही वाचाः एलआयसीची वर्षभरातील सर्वात मोठी कामगिरी, दररोज अदाणी एंटरप्रायझेसचे ‘इतके’ शेअर्स केले खरेदी

सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला

फोर्ब्सनुसार, जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे ९४ वे स्थान आहे. रोहिका सायरस मिस्त्री या दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या पत्नी आहेत. ५५ वर्षीय रोहिका सायरस मिस्त्री यांची संपत्ती ७ अब्ज डॉलर आहे. तसेच बिग बुल म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवालांचा देशातील श्रीमंत महिलांमध्ये समावेश होतो. ५९ वर्षीय रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ५.१ अब्ज डॉलर आहे.

हेही वाचाः कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून GPFचे व्याजदर निश्चित

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4th richest woman in india 32000 crore company and its business in 50 countries who is it vrd
Show comments