7th Pay Commission: केंद्र सरकारद्वारे लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून DA म्हणजेच महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होणार आहे असे म्हटले जात आहे. सातव्या वेतन आयोगाने जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये (वर्षातून दोनदा) महागाई भत्ता वाढवण्यावर अनिवार्य केले आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही.
याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ टक्क्यांच्या आधारे महागाई भत्ता दिला जात आहे. पुढे केंद्राद्वारे यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली. तीन वेळा DA मध्ये वाढ केल्यानंतर केंद्रिय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व पेन्शनधारकांना मिळणारी सवलत यांचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचले. असे असूनही यामध्ये आता वाढ होणार आहे असे म्हटले जात आहे.
भारताच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाची शाखा असलेल्या Labor Bureau च्या सहाय्याने दर महिन्याला CPI-IW निर्देशांकाबाबत माहिती प्रसिद्ध केली जाते. या निर्देशांकावरुन महागाई भत्त्याची गणना केली जाते. DA वाढणार की नाही हेदेखील CPI-IW निर्देशांकावरुन ठरत असते. फेब्रुवारी २०२३ मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आकड्यांमध्ये घट झाली होती. पुढे मार्च महिन्यामध्ये त्यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी लवकरच महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता बळावली आहे.
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळतो. जर जुलै २०२३ मध्ये यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झाली, तर त्यांना ४५-४६ टक्के DA मिळेल. याने कर्मचाऱ्यांचे पगार वाढले जातील. असे असले तरी, केंद्र सरकारने याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने या माहितीबाबत लोक साशंक आहेत.