प्राप्तिकर विभाग करचुकवेगिरीवर सातत्याने नजर ठेवून आहे. विभागाने अशा ८९ प्रकरणांची ओळख पटवली आहे, ज्यात प्रत्येक प्रकरणात जवळपास १०० कोटी रुपयांच्या वर करचोरी झाल्याचा संशय आहे. ही प्रकरणे परदेशात पैसे पाठवण्याशी संबंधित आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२० आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ही करचुकवेगिरी केल्याचं सांगितलं जात असून, याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. सीबीडीटीने कर अधिकाऱ्यांना पडताळणी करून नोटीस पाठवण्यास सांगितले आहे. याशिवाय ३१ प्रकरणे अशी आहेत, ज्यात करचुकवेगिरीची रक्कम ५० कोटींहून अधिक असल्याचा संशय आहे. प्राप्तिकर विभागाची नजर सध्या करचोरी करणाऱ्यांवर खिळलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः RBI नवीन पाच वर्षांचा बाँड आणणार, विक्री ‘या’ तारखेपासून सुरू होणार

१०० कोटी रुपयांचे काळ्या पैशाचे कनेक्शन काय?

एका रिपोर्टनुसार, प्राप्तिकर विभागाने या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांची चौकशी सुरू केली आहे. हे व्यवहार का आणि कोणत्या कारणासाठी झाले, अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. या व्यवहारांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व व्यवहार १०० कोटींहून अधिक रुपयांचे असून, त्यात करचुकवेगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे आणि तिसरी गोष्ट जी शंका निर्माण करते ती म्हणजे हे सर्व व्यवहार परदेशातून झाले आहेत. ज्यावर संबंधितांना अद्यापपर्यंत योग्य माहिती देता आलेली नाही. योग्य तपशील न दिल्याबद्दल त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

यापूर्वी ६८ हजार प्रकरणं समोर आली होती

मार्चच्या सुरुवातीला प्राप्तिकर विभागाने सांगितले होते की, त्यांनी ६८,००० प्रकरणे ओळखली आहेत, ज्यात करचुकवेगिरीची शक्यता आहे. ही सर्व प्रकरणे अशी आहेत की, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. २०१९-२० या वर्षातील व्यवहारांची अशी सर्व प्रकरणे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत.

हेही वाचाः रेरा कायद्यानुसार माहिती न देणाऱ्या १६ हजार प्रवर्तकांना महारेराची नोटीस, १५ दिवसांत पूर्तता करा अन्यथा…

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 89 companies on radar of the income tax department vrd
Show comments