सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने करदात्यांना त्यांचा कायम खाते क्रमांक (PAN) त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. सर्व करदात्यांनी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, कारण याचे पालन न केल्यास १ जुलै २०२३ पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. सिक्युरिटीज मार्केटमधील सर्व व्यवहारांसाठी पॅन हा एकमेव ओळख क्रमांक असल्याने भांडवली बाजार नियामक सेबीनेसुद्धा सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार सुरू ठेवण्यासाठी विद्यमान गुंतवणूकदारांना त्यांचा पॅन क्रमांक हा आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्याचे कारण काय?

एका व्यक्तीला अनेक पॅन खाते क्रमांक देण्यात आल्याची किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना एक पॅन कार्ड वाटप करण्यात आल्याची उदाहरणे समोर आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने पॅनला आधारशी लिंक करण्याची घोषणा केली. PAN डेटाबेसमध्ये डुप्लिकेशन टाळण्याचा हा एक मजबूत मार्ग आहे. पात्र असलेल्या करदात्यासाठी पॅन आणि उत्पन्नाचा परतावा अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य करण्यात आले होते.

हेही वाचाः विश्लेषण : टोमॅटो उत्पादक अन् ग्राहक दोघेही चिंतेत; भाव वाढण्याचे कारण काय? 

आधारशी पॅन लिंक करणे कोणाला आवश्यक?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने मार्च २०२२ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्राप्तिकर कायदा १ जुलै २०१७ पर्यंत पॅन वाटप केलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य केले आहे, जेणेकरून आधार आणि पॅन लिंक करता येऊ शकते. हे ३० जून २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास पॅन कार्ड कामाचे राहणार नाही.

हेही वाचाः क्रेडिट सुईसच्या टेकओव्हरनंतर यूबीएसची मोठी कर्मचारी कपात

आधारशी पॅन लिंक करणे कोणाला आवश्यक नाही?

>> ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती.

>> प्राप्तिकर कायद्यानुसार अनिवासी.

>> एक व्यक्ती जी भारताची नागरिक नाही.

>> ३० जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास काय होणार?

जर एखाद्या व्यक्तीने आपला पॅन आधारशी लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे ती व्यक्ती आपला PAN सादर करू शकणार नाही आणि त्याची माहिती देऊ शकणार नाही. विशेष म्हणजे या प्रक्रियेत ती अयशस्वी झाल्यास प्राप्तिकर कायद्याखालील सर्व परिणामांना ती जबाबदार राहणार आहे.

लिंक न केल्यास काही प्रमुख परिणामांना सामोरं जावं लागणार

>> निष्क्रिय पॅन कार्ड वापरून प्राप्तिकर रिटर्न भरता येणार नाही.

>> प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही.

>> निष्क्रिय पॅन्सना प्रलंबित परतावा जारी केला जाऊ शकत नाही.

>> एकदा पॅन निष्क्रिय झाल्यानंतर सदोष रिटर्नच्या बाबतीत प्रलंबित कार्यवाही पूर्ण केली जाऊ शकत नाही.

>> पॅन निष्क्रिय झाल्यामुळे जास्त दराने कर कपात करणे आवश्यक आहे.

या परिणामांव्यतिरिक्त व्यक्तीला बँकांबरोबर इतर आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात, कारण या व्यवहारांसाठी पॅन हा एक महत्त्वाचा KYC निकष आहे.

सेबीने गुंतवणूकदारांना आधारशी पॅन लिंक करणे अनिवार्य का केले?

PAN हा प्रमुख ओळख क्रमांक आणि सिक्युरिटीज मार्केटमधील सर्व व्यवहारांसाठी KYC आवश्यकतांचा भाग असल्याने सर्व SEBI नोंदणीकृत संस्था आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था (MIIs) यांना सर्व सहभागींसाठी वैध KYC सुनिश्चित करणे आवश्यक आहे. सर्व विद्यमान गुंतवणूकदारांनी सिक्युरिटीज मार्केटमध्ये सतत आणि सुरळीत व्यवहार करण्यासाठी आणि ३० मार्च २०२२ च्या CBDT परिपत्रकाचे पालन न केल्यामुळे होणारे परिणाम टाळण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक केल्याची खात्री करणे आवश्यक आहे, कारण अशी खाती नॉन केवायसी मानली जातील. पॅन आणि आधार लिंक होईपर्यंत सिक्युरिटीज आणि इतर व्यवहारांवर निर्बंध असू शकतात.

आधारशी पॅन लिंक कसे करावे?

प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या लिंक आधार पर्यायावर क्लिक करून पॅन आणि आधार क्रमांक लिंक करू शकतात. http://www.incometax.gov.in.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar pan card linking if pan and aadhaar are not linked by tomorrow what will be the consequences vrd
Show comments