अदाणी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्या कंपनीने सर्वप्रथम इस्रायलचे सर्वात मोठे सरकारी बंदर विकत घेतले. त्यानंतर भारतातील इस्रायलचे माजी राजदूत रॉन माल्का यांना या बंदराचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. APSEZ आणि इस्रायलच्या Gadot समूहाने जानेवारी २०२३ मध्ये हायफा पोर्ट कंपनी (HPC) चे अधिग्रहण पूर्ण केले आहे. माजी राजदूत माल्का यांनी हायफाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हायफा पोर्ट कंपनीच्या कार्यालयात कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे त्यांनी ट्विट केले. @AdaniOnline कडून या नवीन जबाबदारीचे मी स्वागत करतो. हायफा बंदराला आता बंदर क्षेत्रातील अदाणी आणि गडोत यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा होईल आणि ते नवीन उंची गाठेल. २०१८ मध्ये माल्का यांना इस्रायलकडून भारताचे राजदूत बनवण्यात आले होते. त्यांची व्यावसायिक आणि आर्थिक पार्श्वभूमी खूप मजबूत आहे. त्यांनी एमबीएसह अर्थशास्त्रात पीएचडी पदवी घेतली आहे.

वर्षभरापूर्वी टेंडर जिंकले

भारताच्या अदाणी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) आणि इस्रायलच्या गॅडोट ग्रुपने हायफा बंदराच्या खासगीकरणासाठी जुलै २०२२ मध्ये निविदा जिंकली. हे इस्रायलमधील दुसरे सर्वात मोठे बंदर आहे आणि तिथून निम्म्याहून अधिक मालवाहतूक होते. १.१८ बिलियन डॉलरचं टेंडर जिंकल्यानंतर अदानी-गडोत कंसोर्टियमला ​​१०० टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा अधिकार मिळाला.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
rss veteran Swayamsevak Ratnakar Bhagwat passed away at the age of 95
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रत्नाकर भागवत यांचे निधन
mohan bhagwat
Mohan Bhagwat : “घरवापसीमुळे आदिवासी देशद्रोही झाले नाहीत!” प्रणब मुखर्जींच्या विधानाचा मोहन भागवतांनी दिला दाखला
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Trimbakeshwar bus station work still incomplete
त्र्यंबकेश्वर बस स्थानकाचे काम अजूनही अपूर्ण

हेही वाचाः सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील बंदी वाढवली, पण कारण काय?

कोणाची किती भागीदारी?

APSEZ आणि Gadot समूहाने १० जानेवारी २०२३ रोजी इस्रायली सरकारकडून बंदर ताब्यात घेण्याचे काम पूर्ण केले. करारानुसार, APSEZची भागीदारी ७० टक्के, तर Gadot समूहाची भागीदारी ३० टक्के असेल. या बंदराचा सवलत कालावधी वर्ष २०५४ पर्यंत असेल.

हायफा बंदर खास का आहे?

उत्तर इस्रायलमध्ये स्थित हायफा बंदर हे देशातील दोन सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. या बंदरातून देशातील निम्म्या कंटेनर मालाची हाताळणी होते. याशिवाय प्रवासी वाहतूक आणि क्रूझ जहाजे थांबवण्यासाठी हे एक प्रमुख बंदर आहे. सध्या या बंदरावर दोन कंटेनर टर्मिनल आणि दोन मल्टी-कार्गो टर्मिनल बांधण्यात आले आहेत. हायफा बंदराची एकूण लांबी सुमारे २,९०० मीटर आहे. वर्ष २०२१ मध्ये या बंदरातून १४.६ लाख कंटेनर आणि २५.६ लाख टन बल्क कार्गो मालाची ने-आण करण्यात आली होती.

हेही वाचाः मोदी सरकारची महिलांसाठी नवी बचत योजना, एकदाच गुंतवणूक अन् ‘हा’ मोठा फायदा

Story img Loader