अदाणी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्या कंपनीने सर्वप्रथम इस्रायलचे सर्वात मोठे सरकारी बंदर विकत घेतले. त्यानंतर भारतातील इस्रायलचे माजी राजदूत रॉन माल्का यांना या बंदराचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. APSEZ आणि इस्रायलच्या Gadot समूहाने जानेवारी २०२३ मध्ये हायफा पोर्ट कंपनी (HPC) चे अधिग्रहण पूर्ण केले आहे. माजी राजदूत माल्का यांनी हायफाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हायफा पोर्ट कंपनीच्या कार्यालयात कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे त्यांनी ट्विट केले. @AdaniOnline कडून या नवीन जबाबदारीचे मी स्वागत करतो. हायफा बंदराला आता बंदर क्षेत्रातील अदाणी आणि गडोत यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा होईल आणि ते नवीन उंची गाठेल. २०१८ मध्ये माल्का यांना इस्रायलकडून भारताचे राजदूत बनवण्यात आले होते. त्यांची व्यावसायिक आणि आर्थिक पार्श्वभूमी खूप मजबूत आहे. त्यांनी एमबीएसह अर्थशास्त्रात पीएचडी पदवी घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा