अदाणी कौशल्य विकास केंद्र (ASDC) मेटाव्हर्समध्ये आपले केंद्र उघडणारे जगातील पहिले कौशल्य केंद्र बनले आहे, अशी माहिती अदाणी ग्रुप फाऊंडेशनच्या कौशल्य विकास प्रकल्प अदाणी सक्षम(Adani Saksham)ने दिली. सध्या यामध्ये दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अदाणी सक्षमला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. अदाणी फाऊंडेशनने एक निवेदन जारी केले आहे. त्यात ASDC एका टप्प्यात प्रवेश करणार असून, तिथे व्हर्च्युअल क्लासरूम(Virtual Classroom)द्वारे कौशल्य शिकवली जाणार आहेत.
सध्या हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले
देशातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आणि रुग्णालय उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी ASDC ने मेटाव्हर्स येथे जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) आणि अग्निसुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला आहे. येत्या काळात आणखी अनेक अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की, मेटाव्हर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासह सैद्धांतिक ज्ञान दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा संपूर्ण अनुभव आभासी असेल. विद्यार्थी या दोन अभ्यासक्रमांसाठी फक्त लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे नोंदणी करू शकतात, त्यानंतर त्यांना व्हर्च्युअल क्लासरूमचा अनुभव घेता येईल. त्यासाठी VR हँडसेटची गरज भासणार नाही. उद्योगाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम सुरू करण्याचे अदाणी सक्षमचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचाः भारताच्या ‘या’ डावपेचाने चीन गारद; आयातीत २३ टक्क्यांहून अधिक घट
देशभरात ४० कौशल्य केंद्रे स्थापन
Metaverse व्यतिरिक्त देशातील १३ राज्यांमध्ये ४० अदाणी कौशल्य विकास केंद्रे आहेत, जिथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अदाणी सक्षमअंतर्गत १.२५ लाख लोक कुशल झाले आहेत, त्यापैकी ५६,००० लोक नोकरी करीत आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय करीत आहेत.
हेही वाचाः मोठी बातमी! मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आणखी अनेक बँका विकण्याच्या तयारीत