Adani Group stocks crash upto 20 percent: अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला. यानंतर याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले असून शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तसेच अदाणी समूहाच्या शेअरमध्ये जवळपास २० टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. ज्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. पहाटे आलेल्या या बातमीचे पडसाद बाजार उघडताच त्यावर दिसून आले.

अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण दिसली. तर अदाणी एनर्जी सोल्यूशनही लाल रंगात रंगले. अदाणी ग्रीन एनर्जी कंपनीला कंत्राट मिळविण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप ठेवला गेला. या कंपनीच्या शेअरमध्ये १९.१७ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. अदाणी टोटल गॅस १८.१४ टक्के, अदाणी पॉवर १७.७९ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

Maharashtra Assembly Election analysis by girish kuber
Video: “दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीच्या आमदारांची २०१९ च्या तुलनेत बेरीज वाढली तर…”, वाचा, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath shinde devendra fadnavis 2
“आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही”, एक्झिट पोल पाहून शिंदे-फडणवीसांच्या मित्राने शड्डू ठोकला
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
Gautam Adani allegedly offering bribes
विश्लेषण : गौतम अदानींविरोधात अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप काय आहेत? भारतीय अधिकाऱ्यांचा काय संबंध?
Gautam Adani and sanjay raut
Sanjay Raut : “अदाणींविरोधात अटक वॉरंट, त्यांनी देशाला डाग लावलाय”, संजय राऊतांची टीका
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हे वाचा >> Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला

याशिवाय अंबुजा सिमेंट्सच्या शेअरमध्ये १४.९९ टक्के तर एसीसी शेअरमध्ये १४.५४ टक्क्यांची घसरण झाली. अदाणी यांची समूह कंपनी असलेल्या एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही १४.३७ टक्क्यांची घसरण झाली. तर अदाणी विल्मारमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली.

आज सकाळी अदाणी समूहातील तीन प्रमुख कंपन्यांचे शेअर जवळपास २० टक्क्यांनी खाली आल्यामुळे एकूणच अदाणीच्या ११ शेअरवरही परिणाम दिसून आला. अदाणी समूहाचे बाजारमूल्य २ लाख कोटींनी घटले. जानेवारी २०२३ मध्ये हिडेंनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदाणी समूहाची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.