व्यवसाय आणि नीतिमत्तेची सांगड घालणं फार कमी जणांना जमते. पण टाटा समूह हा देशात असा आहे की, ज्यात नीतिमूल्यांची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळेच टाटा समूहाच्या काही कंपन्यांमध्ये मुख्य नीती अधिकाऱ्या(chief ethics officer)ची नियुक्ती केली जाते. परंतु खासगी क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये असा उपक्रम राबवलेला दिसत नाही. परंतु आता आशेचा किरण नक्कीच दिसायला लागला आहे. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने असा पुढाकार घेतला आहे. एचडीएफसी बँकेने मुख्य नीती अधिकाऱ्या (chief ethics officer)चे पद निर्माण केले असून, पोस्टिंगही करण्यात आल्या आहेत. प्रसून सिंह हे एचडीएफसी बँकेचे पहिले चीफ एथिक्स ऑफिसर बनले आहेत. त्याच बँकेत ते मुख्य दक्षता अधिकारी होते. प्रसून सिंह हे बिहारमधील मुजफ्फरपूरचे आहेत.
प्रसून सिंह हे बिहारमधील मुझफ्फरपूर शहरातील आहे. मुझफ्फरपूर येथील सेंट झेवियर्स स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. नंतर शहरातीलच लंगटसिंग कॉलेजमधून आयएससी केले आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. त्यांनी जेएनयूमधून फ्रेंचमध्ये बीए ऑनर्स केले. त्यानंतर त्यांना सेंट्रल एक्साइज आणि कस्टम विभागात इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली. या विभागात त्यांची नियुक्ती मुंबईत झाली होती. तेथे सात वर्षे काम केल्यानंतर ते महसूल गुप्तचर संचालनालय किंवा डीआरआयमध्ये गेले. तेथेही त्यांनी सात वर्षे गुप्तचर अधिकारी म्हणून काम केले. यानंतर जुलै २०१३ मध्ये ते अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीमध्ये दाखल झाले. तेथेही त्यांनी सुमारे चार वर्षे अंमलबजावणी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते एचडीएफसी बँकेत मुख्य दक्षता अधिकारी (CVO) म्हणून रुजू झाले.
नीती अधिकारी का आवश्यक आहे?
जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट यांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन करते, तेव्हा ती दोषी मानली जाते. पण नीतीमत्तेबद्दल बोलायचे तर तो तेव्हाच दोषी ठरतो, जेव्हा तो तसा विचार करतो. याचा अर्थ असा की, व्यवसायादरम्यान नैतिकतेवर परिणाम करणारे काहीही करू नका. टाटा समूहाच्या दैनंदिन व्यवहारात असेच दिसते. कोरोनाच्या काळात सर्वत्र टाळेबंदी सुरू असताना टाटा समूहातील एकाही कर्मचाऱ्याची नोकरी गेली नाही. कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही संपूर्ण मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
हेही वाचाः विश्लेषण: RBIचे व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
नैतिकतेबद्दल रतन टाटा यांचे काय म्हणणे आहे?
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा म्हणतात की, नफा मिळवणे चुकीचे नाही. पण हे काम नैतिकतेच्या आधारावर करणेही आवश्यक आहे. नफा मिळविण्यासाठी तुम्ही काय करत आहात हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कंपन्यांनी नफा कमावताना ग्राहक आणि भागधारकांसाठी कोणते मूल्य जोडले जात आहे हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. हे सर्व पैलू महत्त्वाचे आहेत. सध्याच्या परिस्थितीत आपण घेत असलेले निर्णय योग्य आहेत का, हा प्रश्न व्यवस्थापकांनी स्वत:ला विचारत राहिला पाहिजे. त्यांनी असे म्हटले आहे की, कंपनी जास्त काळ टिकू शकत नाही, जी आपल्या कर्मचार्यांप्रति संवेदनशील नाही. व्यवसायाबाबतचे त्यांचे विचार मांडताना त्यांनी म्हटले आहे की, व्यवसाय म्हणजे केवळ नफा मिळवणे नव्हे. तुमच्याशी निगडीत असलेले भागधारक, ग्राहक आणि कर्मचारी यांचे हितही लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचाः विश्लेषण: RBIचे व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या