दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) हे एक साधे जीवन जगणारे व्यक्ती आहेत. कठोर परिश्रम आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी आपलं नशीब पालटलं आणि आज सर्वांसाठी ते एक प्रेरणास्थान बनले आहेत. या दिग्गज उद्योगपतीने त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी अनेकदा उघड केल्यात. अनेक वेळा ते तरुणांना आपल्या कथेने प्रेरित करतात. एकदा त्यांनी एअर इंडियाची नोकरीची ऑफर नाकारून IIM अहमदाबाद (IIM-A) मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता, तो का घेतला होता याचं कारणच त्यांनी आता सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्जाधीश उद्योगपती असलेल्या नारायण मूर्तींनी आयआयटी कानपूरमधून मास्टर्स केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना देशातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स आल्या. यामध्ये एअर इंडिया, टेल्को, टिस्को या कंपन्यांचा समावेश होता. पण मूर्ती यांनी आयआयएम अहमदाबादमध्ये चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. मोठ्या कंपन्यांच्या ऑफरच्या तुलनेत ही तशी छोटी ऑफर होती. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आयआयएममधला त्यांचा पगार मोठ्या कंपन्यांच्या ऑफरच्या जवळपास निम्मा होता.

हेही वाचाः CNG-PNG Price: नव्या फॉर्म्युल्यामुळे आता CNG-PNG स्वस्त होणार, किमती 10 टक्क्यांनी घटणार; नेमकं गणित समजून घ्या

आयआयएममध्ये टाइम शेअरिंग सिस्टमवर काम केलं

मूर्ती यांनी २०१९ मध्ये हे गूढ उलगडून दाखवले आणि IIM मधील लो-प्रोफाईल नोकरीसाठी मोठ्या कंपन्यांकडून आलेल्या नोकरीच्या ऑफर त्यांनी का नाकारल्या हे उघड केले. याचे कारण असे की, त्यावेळेस आयआयएम देशात पहिल्यांदाच शेअरिंग सिस्टम बसवण्याचा विचार करीत होता. असे करणारी IIM अहमदाबाद ही जगातील तिसरी संस्था होती. त्यापूर्वी फक्त हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डने ही यंत्रणा बसवली होती.

आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय सांगितला

इन्फोसिसचे संस्थापक म्हणाले होते, “माझ्या १६ विद्यार्थ्यांच्या बॅचमधला मी एकटाच असा होतो, जो अर्ध्या पगारावर नोकरीवर रुजू झालो होतो. माझा उद्देश केवळ आधुनिक ऑपरेटिंग सिस्टिमची माहिती घेणे हा होता. यामुळे मला गुणवंत विद्यार्थ्यांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळणार होती. आम्ही विविध प्रकारचे संवादात्मक धडे तयार करणार होतो, म्हणून मी हा मार्ग निवडला. माझ्या आयुष्यातील हा कदाचित सर्वोत्तम निर्णय होता.”

हेही वाचाः Success Story : सिद्धार्थ यांचा ‘हा’ निर्णय! रॉयल एनफिल्ड निघाली ‘बुलेट’च्या वेगात; जाणून घ्या काय घडवली किमया?

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india half salary job at iim rejected says narayan murthy vrd
Show comments