अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३च्या पहिल्या ४८ तासांत सर्वाधिक ग्राहक भेटी, ट्रान्झॅक्शन्स आणि ऑर्डर्स आल्या आहेत. हा आकडा तब्बल ९.५ कोटींच्या घरात आहे. रोजच्या सरासरी खरेदीपेक्षा अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३च्या पहिल्या २४ तासांत प्राईम श्रेणीतील ग्राहकांनी तब्बल १८ पट अधिक खरेदी केली आहे. तर पहिल्या तासात प्रत्येक सेकंदाला ७५हून जास्त स्मार्टफोन्सची खरेदी झाली आहे!
१. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३च्या पहिल्या ४८ तासांत ९.५ कोटी ग्राहकांनी संकेतस्थळाला भेट दिली.
२. कोणत्याही दिवसाच्या एकूण आकड्यापेक्षा जास्त संख्येनं प्राईम श्रेणीतील ग्राहकांनी खरेदीचा अनुभव घेतला.
३. यातील ८० टक्क्यांहून जास्त ग्राहक हे नॉनमेट्रो श्रेणीतील शहरातले आहेत.
४. देशभरातील १० लाखाहून जास्त ग्राहकांना ऑर्डर दिली त्याच दिवशी वस्तूंची डिलिव्हरी झाली.
५. ही आत्तापर्यंत या फेस्टिव्हलला मिळालेली सर्वात धमाकेदार सुरुवात होती. हजारो विक्रेत्यांनी त्यांचा सर्वाधिक विक्रीचा आकडा गाठला. ६५ टक्क्यांहून जास्त विक्रेते हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधले होते. पहिल्या ४८ तासांत या फेस्टिव्हलचा लाभ मिळवणाऱ्या लघु व मध्यम उद्योगांच्या एकूण व्यवसायात तब्बल ३५ टक्के वाढ झाली.
६. स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांनी वनप्लस, सॅमसंग आणि अॅपलच्या मोबाईलला सर्वाधिक पसंती दिली. हा सेल सुरू झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांत ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला तब्बल १०० हून जास्त वनप्लसचे स्मार्टफोन खरेदी केले. २०२२पेक्षा हे प्रमाण अडीच पट जास्त आहे. सॅमसंगच्या प्रीमियम फोन्ससाठी सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली. त्यांच्या सॅमसंग गॅलेक्सी एस सिरीजचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३ पटींनी वाढला.
७. पहिल्या ४८ तासांत अॅमेझॉन पे यूपीआयसाठी आत्तापर्यंतचे सर्वाधिक ग्राहक नोंद झाले. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयसोबतच्या पार्टनरशिप सुविधेमुळे देशातील ३५ कोटींहून जास्त भारतीयांना आता एसबीआयच्या क्रेडिट व डेबिट कार्डवर मिळणाऱ्या सवलतींचा फायदा घेता येईल. आता ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व ईएमआय व्यवहारांवर जास्तीत जास्त ३३ हजार रुपये इतका १० टक्क्यांपर्यंतचा* इन्स्टंट डिस्काऊंट मिळू शकेल.
८. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी फेस्टिव्हलच्या पहिल्या ४८ तासांत विमानाची तिकिटं अडीच पटींनी जास्त बुक झाली. त्यात २०० हून जास्त शहरे व २६० हून जास्त हॉटेलांमधील बुकिंग्जचा समावेश होता.
९. या फेस्टिव्हलदरम्यान अनेक वस्तूंच्या जवळपास ५ हजारांहून जास्त उत्पादनांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन-ब्युटी उत्पादने, घर सजावटीची उत्पादने, घरगुती उपकरणे, फर्निचर, घरातील इतर गोष्टींचा समावेश आहे.
बंगळुरू, ऑक्टोबर १०, २०२३: अॅमेझॉन इंडियावर ४८ तासांचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खरेदी सोहळा पार पडला. यात तब्बल ९.५ कोटी ग्राहकांनी सहभाग घेतला. प्राईम अर्ली अॅक्सेस (PEA) सुविधेच्या पहिल्या २४ तासांत रोजच्या सरासरी खरेदीपेक्षा प्राईम सदस्यांकडून होणाऱ्या खरेदीत १८ पटींनी वाढ झाली आहे. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. हजारो विक्रेत्यांना या काळात एका दिवसात त्यांचा सर्वाधिक खप नोंदवला आहे. त्यांच्या फेस्टिव्हल सीजनची ही सर्वात धमाकेदार सुरुवात ठरली. ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारातील तब्बल ५ हजार नवी उत्पादने उपलब्ध झाली. त्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन-ब्युटीशी संबंधित उत्पादने, घरगुती सजावट, उपकरणे, फर्निचर व इतर साहित्याचा समावेश आहे. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक वैविध्य असणाऱ्या उत्पादनांमधून निवड करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली.
“अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३चे पहिले ४८ तास जबरदस्त होते. फेस्टिव्हलच्या ओपनिंगसाठी पहिल्या २४ तासांत ग्राहकांनी भेट देण्याच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक संख्येमुळे आमचा उत्साह दुणावला आहे. त्याशिवाय पहिल्या २४ तासांत प्राईम अर्ली अॅक्सेसअंतर्गत सर्वाधिक प्राईम सदस्यांनी खरेदीचा आनंद घेतला. अॅमेझॉन डॉट इनसाठी आत्तापर्यंत झालेल्या कस्टमर ट्र्रान्झॅक्शन्स व ऑर्डर्सची संख्या यंदा सर्वाधिक होती हे सांगताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. त्याशिवाय, यंदा सर्वाधिक विक्रेते यात सहभागी झाले होते. टॉप ब्रँड्सची सर्वाधिक उत्पादने या फेस्टिव्हलमध्ये लाँच झाली. सर्वोत्कृष्ट डील, ऑफर्स, बचतीचे उत्तम पर्याय, सर्वात वेगवान डिलिव्हरी आणि पेमेंटचे अनेक पर्याय या माध्यमातून आम्ही या महिनाभर चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना खरेदीचा समाधानकारक आनंद देणार आहोत. आमचे ग्राहक, ब्रँड व बँक पार्टनर्स, विक्रेते आणि डिलिव्हरी सहकारी या सर्वांचे आभार. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ फेस्टिव्हलची इतकी भन्नाट सुरुवात यांच्या सहकाऱ्याशिवाय अशक्य होती”, अशी प्रतिक्रिया अॅमेझॉनचे इंडिया कन्झ्युमर बिझनेसचे व्यवस्थापक व उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी दिली.
विक्रेत्यांना अभूतपूर्व अनुभव!
१. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ची सुरुवातच विक्रेत्यांसाठी अतुलनीय असा अनुभव देणारी झाली. ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम सुरुवात होती. देशभरातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक विक्रेत्यांनी फेस्टिव्हलच्या पहिल्या ४८ तासांत त्यांचं विक्रीचं लक्ष्य साध्य केलं. यातले ६५ टक्के विक्रेते हे दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील आहेत.
२. गेल्या २ महिन्यांत उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हजारो विक्रेते अॅमेझॉन डॉट इनवर नोंद झाले आहेत. भारतात अॅमेझॉनवर तब्बल १४ लाख विक्रेते नोंद आहेत.
३. २०२२च्या तुलनेत या वर्षीच्या उत्सवात पहिल्या ४८ तासांत ३५ टक्क्यांहून अधिक लघु व मध्यम उद्योगांना चांगला व्यवसाय प्राप्त झाला. हा एक नवा विक्रम आहे!
४. महिला नवउद्योजिका व कारागिरांनी असंख्य प्रकारची उत्पादनं या फेस्टिव्हलच्या माध्यमातून विकली. याची संख्या प्रत्येक मिनिटाला १८ इतकी होती.
५. मेक इन इंडिया धोरणानुसार भारतातील डी-टू-सी नवउद्योगांच्या माध्यमातून दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांनी घरगुती सजावटीच्या वस्तू, फॅशन व ब्युटीशी संबंधित वस्तू, फर्निचर यांच्यासाठी प्रामुख्याने मांगणी नोंदवली.
पे करा, स्कॅन करा आणि अॅमेझॉन पेसह सर्वकाही शक्य करा!
१. अॅमेझॉन पे यूपीआयमधील नोंदणीकृत सदस्यांची संख्या ही सेवा सुरू झाल्यापासून तब्बल ३७ टक्क्यांनी वाढली आहे.
२. अॅमेझॉन पेच्या मदतीने भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर विमानाची तिकिटं बुक केली असून ही वाढ तब्बल अडीच पट इतकी आहे.
३. अॅमेझॉन पे आयसीआयसीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा वापर ६५ टक्क्यांनी वाढला आहे. या कार्डच्या वापरातून ग्राहकांना ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळत आहे.
४. क्रेडिट किंवा कर्ज स्वरूपात होणाऱ्या खरेदीमध्ये हफ्त्याची सुविधा सर्वाधिक पसंतीची ठरली असून तिच्या वापरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रत्येक चारपैकी एक ऑर्डर ही हफ्त्यावर दिली जात आहे. त्यासाठी विनाव्याज सेवेचा पर्याय स्वीकारला जात आहे.
५. एसबीआय क्रेडिट व डेबिट कार्डवरील इन्स्टंट डिस्काऊंटची सुविधा ३५ कोटींहून जास्त भारतीयांना उपलब्ध करून देण्यात आली. ग्राहकांना एसबीआयच्या क्रेडिट व डेबिट कार्ड व ईएमआय व्यवहारांव ३३ हजार रुपयांइतका १० टक्क्यांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काऊंटही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ग्राहकांची ५जी स्मार्टफोनला सर्वाधिक पसंती
१. काऊंटरपॉइंटनं** दिलेल्या ताज्या अहवालानुसार ऑनलाईन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी अॅमेझॉन हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे.
२. प्राईम अर्ली अॅक्सेस सेलच्या पहिल्या तासाभरात प्राईम सदस्यांनी प्रत्येक सेकंदाला तब्बल ७५ स्मार्टफोनची खरेदी केली.
३. पहिल्या ४८ तासांत विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्समध्ये प्रत्येक ५ पैकी ४ स्मार्टफोन हे ५जी तंत्रज्ञानाचे होते.
४. विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सपैकी ७५ टक्के स्मार्टफोन हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील ग्राहकांकडून खरेदी करण्यात आले होते.
५. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३० हजाराहून जास्त किमतीच्या प्रीमियम स्मार्टफोनची विक्री ३ पटींनी जास्त झाली आहे. व्याजरहित (नो कॉस्ट इएमआय) खरेजी व एक्स्चेंज ऑफर्स यासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरल्या.
६. वनप्लस, सॅमसंग आणि अॅपल या स्मार्टफोन्सला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली. सेलच्या पहिल्या तासाभरात ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला तब्बल १०० वनप्लस स्मार्टफोन खरेदी केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अडीच पटींनी जास्त होती. सॅमसंगच्या गॅलेक्सी एस सिरीज या प्रीमियम सीरीजमधील फोन्सला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन पट जास्त मागणी आली.
प्रीमियम उपकरणांची मागणी वाढली!
१. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांनी पहिल्या ४८ तासांत ३५ टक्के जास्त स्मार्टवॉचची खरेदी केली.
२. प्रत्येक मिनिटाला १० अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्सची खरेदी झाली.
३. गेल्या वर्षीच्या तुलनेक एकीकडे लॅपटॉपच्या खरेदीत ४० टक्के वाढ झाली असता दुसरीकडे टॅबलेट्सची विक्री गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट वाढली.
नो कॉस्ट इएमआयमुळे गरगुती उपकरणांना पसंती
१. सर्वाधिक प्रीमियम ब्रँड्सच्या खरेदीसाठी ७० टक्क्यांहून जास्त ग्राहकांकडून नव्याने लाँच करण्यात आलेल्या फक्त ९९ रुपये दिवसाला या नो कॉस्ट इएमआय ऑफरचा* लाभ घेतला.
२. सेलच्या पहिल्या ४८ तासांमध्ये जवळपास १ लाख २० हजार ग्राहकांनी त्यांच्या पहिला घरगुती उपकरणाची खरेदी केली.
३. ग्राहकांकडून प्रत्येक सेकंदाला एकाहून जास्त घरगुती उपकरणांची खरेदी केली जात होती. त्यातील जवळपास निम्म्या ग्राहकांनी प्रीमियम उपकरणांची खरेदी केली.
४. यात सर्वाधिक खरेदी ही साईड-बाय-साईड फ्रीज व फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनची झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या खरेदीत अनुक्रमे ४ पट व दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलं.
भारताची फोर के च्या दिशेनं वाटचाल!
१. ग्राहकांनी या काळात प्रत्येक सेकंदाला एका टीव्ही सेटची खरेदी केली. त्यातील ८० टक्क्यांहून जास्त ग्राहक हे दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधली होते. यामध्ये फोर-के टीव्ही सेटची संख्या सर्वाधिक होती.
२. खरेदीदार ग्राहकांमध्ये प्रत्येक ३ ग्राहकांपैकी एका ग्राहकानं टीव्ही खरेदी करताना नो कॉस्ट इएमआयचा पर्याय निवडला.
३. मोठ्या आकाराच्या टीव्ही सेटच्या मागणीत तब्बल २६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
नॉन मेट्रो शहरांमधून प्रीमियम ब्रँड्ससाठी मागणी
१. अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल २०२३ च्या पहिल्या ४८ तासांमध्ये अॅमेझॉन फॅशनची मागणी पाच पटींनी वाढल्याचं दिसलं. त्यात ग्राहकांकडून सर्वोत्कृष्ट ब्रँड्सची प्रीमियम उत्पादनं खरेदी केली जात होती. शिवाय डी टू सी ब्रँड्सच्या मागणीत १० पट वाढ झाल्याचं दिसून आलं.
२. अॅमेझॉन ब्युटीच्या उत्पादनांच्या मागणीत सहा पटींनी वाढ झाली आहे. त्यात मेकअप व प्रीमियम ब्युटी ब्रँड्सचा समावेश आहे.
३. या फेस्टिव्हल काळात आलेल्या ग्राहकांपैकी ८० टक्क्यांहून जास्त ग्राहक हे नॉन मेट्रो शहरांमधून आले होते.
४. अॅमेझॉन फॅशन उत्पादनांची निम्म्याहून जास्त विक्री दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये झाली.
५. या काळात फॅशन ज्वेलरीच्या विक्रीत दुप्पट, सौंदर्य उत्पादनांच्या विक्रीत पाचपट, १९९ रुपयांखालील किमतीच्या साड्यांच्या विक्रीत १० पट, २९९ हून कमी खरेदी असणाऱ्या पोलो टीशर्टची विक्री सहा पट तर स्पोर्ट्स शूजची विक्री सहा पट वाढली आहे.
रोजच्या गरजेच्या वस्तूंची मागणी वाढली
- गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट ग्राहकांनी अॅमेझॉन फ्रेशवरून त्यांच्या रोजच्या गरजेच्या गोष्टी खरेदी केल्या. पहिल्यांदा या वस्तूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या तीन पट वाढली, तर दुसऱ्या श्रेणीतील नव्या ग्राहकांची संख्या तीन पटींनी वाढली.
दररोजच्या गरजेच्या वस्तू मिळवणं सहस-सोपं झालं
१. गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहकांनी रोजच्या गरजेच्या वस्तूंची या वर्षी दीड पट जास्त खरेदी केली. खास फेस्टिव्हल सीजनसाठी सादर केलेल्या असंख्य उत्पादनांमधून ग्राहकांनी त्यांना हव्या त्या उत्पादनांची निवड केली.
२. यंदा भारतीय ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर ड्रायफ्रूट, सुकामेव्याची खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण तब्बल पाच पट जास्त होतं.
३. फेस्टिव्हलच्या शेवटच्या ४८ तासात ग्राहकांनी आत्तापर्यंतचे सर्वाधिक डिस्पोजेबल डायपर्स खरेदी केले.
घरगुती वस्तूंच्या खरेदीत अव्वल
१. सोलर पॅनलच्या खरेदीतील ८ पट वाढ व इव्हीजच्या खरेदीत झालेली २५ पट वाढ ही ग्राहकांच्या पर्यावरणप्रेमाची आणि शाश्वत विकासाविषयीच्या दृढ निष्ठेचीच खात्री देत होती.
२. घरातील रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर व ब्रशलेस डायरेक्ट करंट फॅन्स अर्थात बीएलडीसी यांच्या मागणीत ४ पट वाढ झाली.
३. सोफासेट, कपाटं, रिक्लायनर्स आणि बेडच्या मागणीत १२.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
४. ग्राहकांना त्यांच्या घराची सजावट करायला नक्कीच आवडतं. त्यामुळेच पेंट्सच्या मागणीतील ५ पट वाढ, किचन व बाथरूमच्या साहित्याच्या मागणीत ४ टक्के वाढ ही दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या श्रेणीतील शहरांमधून नोंदवण्यात आली.
५. सर्व महत्त्वाच्या कॅटेगरीजमधील उत्पादनांच्या खरेदीसाठी अॅमेझॉनची घरपोच सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचं दिसून आलं. त्यामुळेच ही सेवा निवडण्यात ३ पट वाढ दिसून आली.
बी२बी ग्राहकांची अॅमेझॉन बिझनेससह खरेदी करण्यास पसंती
१. फेस्टिव्हलच्या पहिल्या २४ तासांत अॅमेझॉन बिझनेसवर या वर्षीची सर्वाधिक नव्या ग्राहकांची नोंदणी झाली.
२. पहिल्या ४८ तासांत अॅमेझॉन बिझनेसवर मोठ्या प्रमाणावर ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांची संख्या २०० टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. प्रत्येक ग्राहकानुसार अॅमेझॉन बिझनेसवर होणारा खर्च हा साधारण १.४ पटींनी वाढल्याचं दिसून आलं.
खेळणी व गेम्सच्या मागणीत वाढ
१. फेस्टिव्हलच्या पहिल्या ४८ तासांत लिगो बेस्टसेलर्सच्या मागणीत १५ पटींची वाढ तर सोनी प्लेस्टेशन फाईव्हच्या मागणीत ९ पटींची वाढ नोंदवण्यात आली.
२. आऊटडोअर टॉय श्रेणीतील खेळण्यांसाठी सर्वाधिक मागणी यावेळी नोंद झाली. त्यामध्ये टॉयझोनच्या राईड-वन खेळण्यांसाठी व अॅमेझॉनच्या विविध ब्रँड्ससाठी मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त होती.
अतिरिक्त माहितीसाठी कृपया संपर्क करा:
अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हलमधील विविध ऑफर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. प्रेस रिलीज, फोटो व इतर माहितीसाठी आमच्या प्रेस सेंटरला भेट द्या.
सूचना: उत्पादनांची माहिती, विश्लेषण, किमती या विक्रेत्यांकडून पुरवण्यात आलेल्या आहेत. त्यात अॅमेझॉनचा सहभाग नाही. विक्रेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या स्पष्टतेसाठी व सत्यतेसाठी अॅमेझॉन जबाबदार नाही. उत्पादनांवरील डील्स व डिस्काऊंट्स हे विक्रेत्यांकडून किंवा ब्रँड्सकडून पुरवण्यात आले आहेत. उत्पादनांची माहिती, वैशिष्ट्ये व डील्स याविषयीची माहिती विक्रेत्यांनी पुरवली असून जशीच्या तशी देण्यात आली आहे.