अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने २०३० पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १२.७ अब्ज डॉलर म्हणजेच एक लाख पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा जाहीर केली आहे. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. भारतातील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नियोजित गुंतवणूक दरवर्षी भारतीय व्यवसायात अंदाजे सरासरी १,३१,७०० पूर्णवेळ समतुल्य नोकऱ्यांना समर्थन देणार आहे. क्लाऊड प्लॅटफॉर्म स्टोरेज, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह २०० हून अधिक सेवांसाठी संधी प्रदान करतो.

विशेष म्हणजे भारत मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सीईओ अ‍ॅडम सेलिपस्की म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत प्रचंड ऊर्जा आणि उच्च वाढीची क्षमता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला Cisco Systems ने जाहीर केले की, ते तिच्या जागतिक पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी भारतात उत्पादन सुरू करेल. तसेच Apple Inc पुरवठादार फॉक्सकॉन तेलंगणात आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी ५०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करेल.

Foxcon तेलंगणात करणार तब्बल ८ हजार कोटींची गुंतवणूक

iPhone ची सर्वात मोठी कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉन बंगळुरूमध्ये एक प्लांट उभा करणार आहे. यासाठी फॉक्सकॉनची कर्नाटक सरकारशी चर्चा सुरु होती. अखेर कर्नाटक सरकारने या प्लांट उभारणीला मंजुरी दिल्याने फॉक्सकॉन कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक सरकारने ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून बांधण्यात येणाऱ्या आयफोन निर्मितीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?