अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने २०३० पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १२.७ अब्ज डॉलर म्हणजेच एक लाख पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा जाहीर केली आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. भारतातील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नियोजित गुंतवणूक दरवर्षी भारतीय व्यवसायात अंदाजे सरासरी १,३१,७०० पूर्णवेळ समतुल्य नोकऱ्यांना समर्थन देणार आहे. क्लाऊड प्लॅटफॉर्म स्टोरेज, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह २०० हून अधिक सेवांसाठी संधी प्रदान करतो.
विशेष म्हणजे भारत मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सीईओ अॅडम सेलिपस्की म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत प्रचंड ऊर्जा आणि उच्च वाढीची क्षमता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला Cisco Systems ने जाहीर केले की, ते तिच्या जागतिक पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी भारतात उत्पादन सुरू करेल. तसेच Apple Inc पुरवठादार फॉक्सकॉन तेलंगणात आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी ५०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा