भारतातील काही धनाढ्य कुटुंबांच्या व्यवसायाची एकत्रित मूल्यांकन ६,००९,१०० कोटींच्या घरात असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे, याबद्दल बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे. या अहवालानुसार, धनाढ्य कुटुंबाच्या यादीत अंबानी कुटुंब सर्वात अग्रस्थानी आहे. त्यानंतर बजाज आणि बिर्ला परिवाराचा क्रमांक लागतो. या तीनही कुटुंबांची एकत्रित संपत्ती ४६० बिलियन डॉलर असल्याचे सांगितले जाते. जी सिंगापूरच्या एकूण जीडीपी एवढी आहे.

“२०२४ बार्कलेच प्रायव्हेट क्लाइंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्यूबल फॅमिली बिझनेस” (2024 Barclays Private Clients Hurun India Most Valuable Family Businesses) या अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे. ज्या कुटुंबाना उद्योगाची परंपरा लाभली आहे, अशा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतील कंपन्यांची संख्या १० एवढी आहे. तर पहिल्या पिढीत उद्योगाची भरभराट करणाऱ्या १६ कंपन्या आहेत. यात अदाणी कुटुंब सर्वात वरच्या स्थानी आहे. त्यानंतर पुण्याच्या सायरस पुनावाला यांचा क्रमांक लागतो.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

हे वाचा >> RBI Monetary Policy Meeting 2024 : गृहकर्ज, वाहनकर्जाचे हप्ते वाढणार नाहीत; ‘आरबीआय’ कडून व्याजदर जैसे थे!

अंबानी, बजाज, बिर्ला या उद्योजक कुटुंबाची संपत्ती किती?

अंबानी परिवाराची रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे मूल्यांकन २,५७५,१०० कोटी असल्याचे सांगितले जाते. जी भारतातील सर्वात धनाढ्य कौटुंबिक कंपनी आहे. ऊर्जा आणि टेलिकॉम क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केल्यामुळे रिलायन्सला मोठे यश मिळालेले आहे.

बजाज कुटुंब ऑटोमोबाइल आणि ऑटो पार्ट्सच्या व्यवसायासाठी ओळखले जाते. त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन ७१२,७०० कोटी इतकी असून ही कंपनी दुसऱ्या क्रमाकांवर आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील आदित्य बिर्ला समूह धातू आणि खाण व्यवसायात गुंतलेला आहे. त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन ५३८,५०० कोटी रुपये इतके असून ही कंनपी तिसऱ्या स्थानावर आहे.

या अहवालातील यादीनुसार इतरही कुटुंबांच्या व्यवसायांचा उल्लेख आहे. जसे की, जिंदल परिवार (जेएसडब्लू स्टील), नाडर परीवार (एचसीएल टेक्नॉलॉजी), महिंद्रा परिवार (महिंद्रा अँड महिंद्रा), दाणी, चोक्सी आणि वकील परीवार (एशियन पेंट्स), प्रेमजी परिवार (विप्रो), राजीव सिंह परिवार (डीएसएफ) आणि मुरुगप्पा परिवार (ट्यूब इन्वेस्टमेंट्स ऑफ इंडिया) अशा काही कुटुंबांचा उल्लेख आहे.

अंबानी कुटुंबाची संपत्ती भारताच्या जीडीपीच्या १० टक्के

विशेष म्हणजे अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असून त्यांची एकत्रित संपत्ती २५.७५ लाख कोटी रुपये आहे. जी भारतीय अर्थव्यवस्थेच्या १० टक्के इतकी आहे. या यादीत ज्या उद्योजक कुटुंबांचा उल्लेख केला गेला आहे. त्यांची एकत्रित संपत्ती १.३ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. जी स्वित्झर्लंड आणि यूएईच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक आहे. या अहवालातील यादीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही उद्योजक कुटुंबाकडे कमीत कमी २,७०० कोटी रुपये संपत्ती असणे आवश्यक आहे.

मुंबई विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण

या अहवालातील यादीत १५ कंपन्यांचे नेतृत्व महिलांकडे आहे, ही विशेष बाब यातून दिसते. दुसरी खास बाब म्हणजे बहुतेक कुटुंबातील सदस्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबई विद्यापीठाची संलग्न संस्थांमधून घेतले आणि त्यानंतर पुढे हार्वर्ड बिझनेस स्कूल संस्थेतून पुढील शिक्षण घेतले.

Story img Loader