छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये आलेले अमित जैन यांचे नाव आपण ऐकलेच असेल. विशेष म्हणजे अमित जैन हे छोटं नाव नसून CarDekho.com (CarDekho.Com) चे सह-संस्थापक आहेत. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेल्या मोजक्या भाग्यवान लोकांपैकी ते एक आहेत. अमित जैन यांनी रतन टाटा यांचे ८५ व्या वाढदिवसानिमित्त आभार मानणारी एक लांबलचक लिंक्डइन पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी अनेक गुपिते उघडली होती. ते कसे दिवाळखोर झाले हे त्यांनी सांगितले आणि मग तिथून पुन्हा कशी सुरुवात केली आणि आज ते तिथे कसे पोहोचले हेसुद्धा त्यांनी अधोरेखित केले.

आपल्या दिवाळखोरीची कहाणी सांगताना अमित जैन म्हणाले, “आम्ही (मी आणि माझा भाऊ) शेअर मार्केटमध्ये १.५ कोटी रुपये गमावले आणि दिवाळखोर झालो. साहजिकच ते खूप मोठे नुकसान होते, पण आम्हाला माहीत होते की, आमच्याकडे मनुष्यबळ आणि बुद्धी दोन्ही आहेत म्हणून आम्ही पुन्हा सुरुवात केली.”

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

रतन टाटा बनले ‘आजीवन प्रेरणा’

अमित जैन हे रतन टाटा यांना त्यांचे आजीवन प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मानतात. त्यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले की, “लोक अनेकदा रतन टाटाजींच्या नम्रता, शांत स्वभाव आणि शहाणपणाबद्दल बोलतात. मी ही सांगू शकतो की हे अगदी खरे आहे. २०१५ मध्ये रतन टाटाजी आमचे गुरू बनले, जेव्हा आम्ही कार देखो वाढवण्याचे आणि युनिकॉर्न बनण्याचे स्वप्न पाहत होतो. मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, आम्हाला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक मिळाला, याचा मला आनंद आहे. लोक बरोबर म्हणतात की, एक मार्गदर्शक असा असावा जो तुमच्यातील क्षमता पाहतो, जो तुम्हाला स्वतःमध्ये दिसत नाही आणि तुम्हाला ती विकसित करण्यात मदत करतो.”

जैन यांनी लिहिले, “प्रत्येकाला एक असा मार्गदर्शक मिळाला पाहिजे, जो तुम्हाला कठीण काळात प्रेमाने साथ देतो आणि तुम्ही सर्वोत्तम देण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे तुम्ही जयपूरच्या त्या 2 उद्योजकांना विचारू शकता, जे डोळ्यात स्वप्ने घेऊन रतन टाटाजींना भेटले होते आणि त्यांना माहीत होते की, आता त्यांचे जीवन बदलणार आहे.

हेही वाचाः विश्लेषण: दुधाच्या वाढत्या दराला काय ठरतेय कारणीभूत, नेमकं गणित समजून घ्या

अमित जैन यांची एकूण संपत्ती

कार देखो २००८ मध्ये अमित जैन यांनी सुरू केली होती. २०२१ मध्ये त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन १.२ अब्ज डॉलर होते. आजच्या विनिमय दरानुसार ते ९,८३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमित जैन यांची स्वतःची संपत्ती आज २९०० कोटी रुपये आहे.

हेही वाचाः SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा; बँकेने MCLR मध्ये केला नाही बदल, आता नवे व्याजदर काय?

Story img Loader