तुम्हाला ‘अवतार’ हा हॉलिवूडपट आठवतोय का? होय, तोच ज्यामध्ये पृथ्वीवरील लोक इतर ग्रहांच्या लोकांचा वेश धारण करतात आणि अनेक प्रकारचे संशोधन करण्यासाठी तेथे जातात. परंतु नंतर इतर ग्रहांवर आढळणारी अनेक खनिजे आणि इतर पदार्थ या मोहिमेतून पृथ्वीवर पाठवले जातात, ज्याचा ते अब्जावधी डॉलर्समध्ये व्यापार करतात. विशेष म्हणजे त्यात दुसऱ्या ग्रहावर मानवी वसाहतदेखील तयार केली जाते. खरं तर जगातील ३ देशांनी चंद्रावर पाय ठेवले आहेत. भारत हे चांद्रयान ३ द्वारे चंद्रावर पाय ठेवणार आहे, त्यामुळे ‘मून इकॉनॉमी’ देखील तयार होत आहे का? ही ‘मून इकॉनॉमी’ म्हणजे काय आणि भारत त्याचा भाग कसा असणार आहे ते समजून घेऊ यात.

भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यश मिळवले आहे. भारताचे चांद्रयान ३ यशस्वी झाल्यास या क्लबमध्ये प्रवेश करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. त्यामुळेच भारताबरोबरच हे देशही ‘मून इकॉनॉमी’मध्ये स्पर्धक ठरणार आहेत, कारण त्यांना कुठेतरी त्याचा फायदा नक्कीच मिळणार आहे. ‘अवतार’ हा एक विज्ञान कथेवर (SIFI) आधारित चित्रपट होता, ज्यामध्ये सर्व काही त्वरित घडते. पण प्रत्यक्षात चंद्रावर असे काही घडायला अनेक दशके लागू शकतात. तरीही ही ‘मून इकॉनॉमी’ म्हणजे नेमके काय? हे जाणून घेऊ यात.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

‘मून इकॉनॉमी’ म्हणजे काय?

अनेक देश चंद्रावर अवकाश मोहिमा राबवत आहेत. चंद्राशी संबंधित सर्व अंतराळ हालचाली, उत्पादन, अंतराळ स्थानके बांधणे, चंद्राच्या पृष्ठभागावरून मिळालेल्या संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाण, डेटा, चंद्रावरील पर्यटन, चंद्रावरील जमीन बुक करणे इत्यादी सर्व ‘मून इकॉनॉमी’चा भाग आहेत. पीडब्लूसीच्या अहवालात असे म्हटले आहे की, चंद्रावर कोणत्याही स्वरूपात मानवी उपस्थिती ही खरोखरच ‘मून इकॉनॉमी’ आहे.

‘मून इकॉनॉमी’चे तीन मूलभूत टप्पे आहेत. प्रथम चंद्रावर अंतराळ मोहीम पाठवून अभ्यास करणे, मानव पाठवणे, पर्यटन उद्योग उभारणे. दुसऱ्या टप्प्यात चंद्रावरून मिळालेल्या माहितीचे व्यापारीकरण करणे, चंद्रावर स्पेस स्टेशन बांधणे, खनिज संपत्तीचा व्यापार करणे इत्यादी आणि तिसऱ्या टप्प्यात चंद्रावर मानवाची वसाहत निर्माण करण्याचे काम करणे आहे.

हेही वाचाः दोन लाखांच्या गुंतवणुकीने सुरुवात अन् आज २ लाख कोटींचे मालक, आता कन्येच्या हाती कंपनीची कमान

एलन मस्कपासून जेफ बेझोसपर्यंतचे दावेदार

जगातील अनेक देश सध्या ‘चंद्रावर’ मानवाला पाठवण्याच्या कसरती करीत आहेत. भारताची चांद्रयान ३ मोहीम देखील त्याचाच एक भाग आहे. जर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर योग्यरित्या उतरले, तर भारतदेखील चंद्रावर मानव पाठवू शकेल. जसे अमेरिकेने १९६९ मध्ये केले होते. जेफ बेझोसच्या ‘ब्लू ओरिजिन’ आणि एलोन मस्कच्या ‘स्पेसएक्स’ व्यवसायाचा उद्देश चंद्रावर मानव पाठवणे हा आहे.

‘मून इकॉनॉमी’ किती मोठी?

२०४० पर्यंत १००० अंतराळवीर चंद्रावर असतील. यापैकी ४० फक्त २०३० पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, असंही पीडब्लूसीचा अहवाल सांगतो. अशा परिस्थितीत चंद्रावर जाण्यासाठी लागणारी उपकरणे, अंतराळयान, दुर्बिणी तसेच अनेक टीव्ही शो आणि चंद्राशी संबंधित इतर कार्यक्रम इत्यादी ‘मून इकॉनॉमी’चा भाग होऊ शकतात. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होणार आहे. चंद्राशी संबंधित ही अर्थव्यवस्था ६३४ अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकते.

हेही वाचाः विश्लेषण : आता भारताच्या UPI चा फ्रान्समध्ये वाजणार डंका, त्याचा काय होणार फायदा?

भारत ‘मून इकॉनॉमी’चा स्पर्धक कसा बनेल?

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. चंद्राशी संबंधित अर्थव्यवस्थेत ‘फर्स्ट मूव्हर’ असण्याचा फायदा भारताला मिळणार आहे. याशिवाय भारताच्या अंतराळ मोहिमेचा खर्च जगातील अनेक देशांपेक्षा कमी आहे, त्यामुळे भारत चांद्रयान मोहिमा राबवून जगातील इतर अनेक देशांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा उचलू शकतो. यामुळे चंद्रावर वापरण्यात येणारी अनेक उपकरणे बनवण्यासाठी भारत हे आवडते ठिकाण बनू शकते.