भारतातून जवळपास ६,५०० अति श्रीमंत व्यक्ती देश सोडून जाणं अपेक्षित असल्याचा हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन (२०२३) च्या अहवालानं एकच खळबळ उडाली आहे. जगभरातील संपत्ती आणि गुंतवणुकीच्या स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्टच्या ताज्या अहवालात हे सांगण्यात आले आहे. खरं तर उच्च नेट वर्थ व्यक्ती (HNWI) म्हणजे काय ते समजून घेऊ. भारतातील HNWI असे लोक आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी किमान १ दशलक्ष डॉलर आहेत. रुपयांमध्ये सांगायचे झाल्यास ही रक्कम सुमारे ८ कोटी २० लाख इतकी आहे. घर आणि कार, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इतर घरगुती वस्तूंचा या पैशात समावेश नाही. अहवालानुसार, चीननंतर भारत हा दुसरा देश आहे, जिथून बहुतेक श्रीमंत लोक देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होत आहेत. देश सोडून जाणाऱ्या श्रीमंतांमध्ये चीन हा एकमेव देश आहे, जिथे भारतापेक्षा जास्त श्रीमंत लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. २०२३ मध्ये चीनमधील साडे तेरा हजार श्रीमंत लोक देश सोडून जाऊ शकतात. श्रीमंतांनी देश सोडून जाण्याच्या बाबतीत ब्रिटनचा जगात तिसरा क्रमांक लागतो. यंदा ३२०० HNWI UK मधून देश सोडू शकतात. त्याचवेळी रशिया या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. रशियातून तीन हजार श्रीमंत लोक देश सोडू शकतात. २०२२ मध्ये ८५०० श्रीमंत लोकांनी रशिया देश सोडला.

विशेष म्हणजे भारत सोडून श्रीमंत भारतीयांचे आवडते देश कोणते आहेत. एकीकडे चीन, भारत, ब्रिटन, रशिया आणि ब्राझीलमधील अब्जाधीशांचा समूह आपापले देश सोडण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे हे श्रीमंत लोक जगातील ५ देशांमध्ये स्थायिक होणे सर्वात योग्य मानत आहेत. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, सिंगापूर, अमेरिका आणि स्वित्झर्लंडची नावे आघाडीवर आहेत. या देशांपैकी दुबई आणि सिंगापूर ही श्रीमंत भारतीय कुटुंबांसाठी पसंतीची ठिकाणे आहेत. दुबई सरकारद्वारे चालवलेला “गोल्डन व्हिसा” कार्यक्रम भारतातील अनेक श्रीमंत लोकांना आकर्षित करीत आहे. गोल्डन व्हिसा अंतर्गत दुबई सरकार गुंतवणूकदार, संशोधक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ५ ते १० वर्षे UAE मध्ये राहण्याची परवानगी देते. गोल्डन व्हिसा मिळवणेदेखील खूप सोपे आहे. हेन्लीच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये ७५०० HNWI भारत सोडून गेलेत.

young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

आता श्रीमंत लोक भारत का सोडत आहेत हा प्रश्न आहे. हेन्ली अँड पार्टनर्स कंपनीत श्रीमंतांच्या पैशाची काळजी घेणारे ग्रुप हेड डॉमिनिक वोलेक म्हणतात की, श्रीमंत लोकांचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. सुरक्षिततेमुळे अनेकांना दुसऱ्या देशात स्थायिक व्हायचे असते. काही देशातील श्रीमंत लोक आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी परदेशात स्थलांतरित होत आहेत. काही लोकांना आता त्यांच्या देशातील हवामान आवडत नाही. इतकेच नाही तर काही श्रीमंत लोकांना इतर देशांमध्ये स्थायिक व्हायचे आहे, कारण तेथे क्रिप्टोकरन्सीला मान्यता आहे.

भारतातून श्रीमंत बाहेर जाण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे भारतातील करविषयक कायदे अतिशय कडक आहेत आणि त्यात गुंतागुंत आहे. Henley & Partners चे CEO Jurg Steffen सांगतात की, जगातील बहुतेक लोक आपला देश सोडून जात आहेत, कारण ते ज्या देशांमध्ये स्थायिक होणार आहेत, तेथे राजकीय स्थिरता आहे. त्या देशांमध्ये कर खूप कमी आहेत आणि गुंतवणुकीच्या भरपूर संधी आहेत. याशिवाय हे श्रीमंत लोक वैयक्तिक स्वातंत्र्य, चांगली जीवनशैली आणि मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी देश सोडून जात आहेत. श्रीमंतांचे भारत सोडून जाणे ही देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे. ग्लोबल वेल्थ इंटेलिजन्स फर्म न्यू वर्ल्ड वेल्थ प्रोजेक्टचा विश्वास आहे की, २०३१ पर्यंत भारतातील श्रीमंतांचा समूह खूप वेगाने वाढेल. पुढील सुमारे ८ वर्षांमध्ये भारतात एचएनआयच्या संख्येत ८० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे, असंही या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचाः ऑफिसला यायला सांगितल्यामुळे टीसीएसमधल्या महिला सामूहिक राजीनामा देतायत? कंपनीनं दिलं उत्तर

खरं तर भारत हा जगातील एकमेव देश असेल जिथे लोकांच्या संपत्तीत एवढी झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. मोठ्या संख्येने लोक भारत सोडून जात असले तरी अनेक श्रीमंत लोकही वेगाने आपल्या मायदेशी परतत आहेत. भारतातील चांगल्या आर्थिक आणि आरोग्य सुविधांमुळे लोक भारतात परत येत आहेत आणि यापुढेही मोठ्या संख्येने श्रीमंत लोक भारतात परतण्याची अपेक्षा आहे. २०२२ च्या अखेरीस भारत जगातील १० श्रीमंत देशांपैकी एक होता. भारतात ३ लाख ४४ हजार ६०० एचएनआय आहेत. १०७८ टक्के कोट्यधीश आहेत, ज्यांची संपत्ती ८०० कोटींपेक्षा जास्त आहे, त्यांना सेंटी मिलियनेअर म्हणतात. याशिवाय देशात १२३ अब्जाधीश आहेत. या अब्जाधीशांची संपत्ती ८२०० कोटी रुपयांहून अधिक आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये २ लाख २५ हजार भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. २०११ ते २०२२ पर्यंत नागरिकत्व सोडण्याच्या बाबतीत ही संख्या सर्वाधिक आहे.

हेही वाचाः या वर्षी ६,५०० अतिश्रीमंत व्यक्ती भारताचा त्याग करणार : अहवाल

अति श्रीमंत देश का सोडत आहेत?

हेन्ली अँड पार्टनर्सचे सीईओ ज्युर्ग स्टीफन यांनीसुद्धा अति श्रीमंत देश का सोडत आहेत, याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमंत कुटुंबे सुरक्षित वातावरण शोधत असतात. तसेच त्यांना उच्च दर्जाचा सोयी-सुविधाही पाहिजे असतात. देशांतर्गत आर्थिक हालचालींवरही त्यांचे लक्ष असते. त्यामुळे भविष्याच्या विचार करून ते देश सोडण्याचा निर्णय घेतात. देशातील वातावरण त्यांच्या संपत्तीच्या संभाव्य धोक्यांसाठी अधिक संवेदनशील असल्यामुळे ते सावध होऊन असा निर्णय घेतात. अति श्रीमंतांचा देश सोडण्याचा कल हा बहुधा देशावरचा आत्मविश्वास कमी होण्याचे संकेत आहेत, असंही हेन्ली अँड पार्टनर्सचे सीईओ ज्युर्ग स्टीफन सांगतात. राजकीय स्थिरता, कमी कर आकारणी आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हे अति श्रीमंतांसाठी नेहमीच महत्त्वाचे मापदंड राहिले आहेत. त्यांच्या मुलांचे भविष्य, जीवनाची गुणवत्ता, त्यांचा वारसा जपण्यासाठीच ते असा निर्णय घेत असतात. संपत्तीसाठी सुरक्षित आश्रयस्थान असण्याबरोबरच देशांतर्गत सुरक्षितता हासुद्धा महत्त्वाचा घट आहे. कायद्याचं राज्य अस्तित्वात असलेल्या आणि आर्थिक स्वातंत्र्य मजबूत असलेल्या देशांमध्येच ते संपत्ती साठवून ठेवण्याचा आश्रय शोधतात, असंही ज्युर्ग स्टीफन म्हणतात.