भारतातून जवळपास ६,५०० अति श्रीमंत व्यक्ती देश सोडून जाणं अपेक्षित असल्याचा हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन (२०२३) च्या अहवालानं एकच खळबळ उडाली आहे. जगभरातील संपत्ती आणि गुंतवणुकीच्या स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्टच्या ताज्या अहवालात हे सांगण्यात आले आहे. खरं तर उच्च नेट वर्थ व्यक्ती (HNWI) म्हणजे काय ते समजून घेऊ. भारतातील HNWI असे लोक आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी किमान १ दशलक्ष डॉलर आहेत. रुपयांमध्ये सांगायचे झाल्यास ही रक्कम सुमारे ८ कोटी २० लाख इतकी आहे. घर आणि कार, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इतर घरगुती वस्तूंचा या पैशात समावेश नाही. अहवालानुसार, चीननंतर भारत हा दुसरा देश आहे, जिथून बहुतेक श्रीमंत लोक देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होत आहेत. देश सोडून जाणाऱ्या श्रीमंतांमध्ये चीन हा एकमेव देश आहे, जिथे भारतापेक्षा जास्त श्रीमंत लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. २०२३ मध्ये चीनमधील साडे तेरा हजार श्रीमंत लोक देश सोडून जाऊ शकतात. श्रीमंतांनी देश सोडून जाण्याच्या बाबतीत ब्रिटनचा जगात तिसरा क्रमांक लागतो. यंदा ३२०० HNWI UK मधून देश सोडू शकतात. त्याचवेळी रशिया या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. रशियातून तीन हजार श्रीमंत लोक देश सोडू शकतात. २०२२ मध्ये ८५०० श्रीमंत लोकांनी रशिया देश सोडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा