टायर निर्माता कंपनी CEAT लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनंत गोयंका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांना कंपनीच्या उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. वर्ष २०१२ मध्ये अनंत गोयंका यांना CEAT कंपनीचे एमडी आणि सीईओ बनवण्यात आले. CEAT कंपनीने अनंत गोयंका यांच्या जागेवर अर्णब बॅनर्जी यांची CEAT चे नवे MD आणि CEO म्हणून २ वर्षांसाठी नियुक्ती केली असून, १ एप्रिल २०२३ पासून ते पदभार स्वीकारतील. अनंत गोयंका बोर्डाचे सदस्य म्हणून कायम राहतील, असेही CEAT लिमिटेडने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने देदीप्यमान कामगिरी केली आहे. एका वर्षात CEAT चा शेअर्स ४० टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी शेअर्सने तीन वर्षांत १०० टक्के परतावा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा