Make in India Apple Production and Export Rises : अमेरिकेतील दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपल (Apple) गेल्या काही वर्षांपासून त्यांचं चीनवरील अवलंबित्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अॅपल कंपनी आयफोन (iPhone) निर्मितीसाठी चीनऐवजी भारतावर लक्ष केंद्रीत करत आहे. कंपनीच्या या प्रयत्नांना यश आलं आहे, तसेच भारताचंही त्यांना उत्तम सहकार्य लाभत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामुळेच या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यांत आयफोनच्या एकूण निर्यातीत एक तृतीयांश वाढ झाली आहे. याचाच अर्थ अॅपलचं भारतातील उत्पादन वाढलं आहे. चीनने भारतातील उत्पादन वाढवून चीनमधील उत्पादन कमी करण्यावर भर दिला आहे.
यामध्ये म्हटलं आहे की अॅपलने भारतात बनवलेले सहा अब्ज डॉलर्स किंमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. याद्वारे आयफोनच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत एक तृतीयांश वाढ झाली आहे. यावरून असं दिसतंय की आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अॅपल १० अब्ज डॉलर्सहून अधिक किंमतीचे आयफोन निर्यात करेल. अॅप्पलने भारतातील उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. कंपनी त्यांच्या उत्पदानाचा वेग वाढवण्यावर, उत्पादन क्षमता वाढवण्यावर लक्ष देत आहे. स्थानिक अनुदान, कुशल कामगार व उत्तम तांत्रिक पाठबळाच्या जोरावर कंपनीचा भारतात विस्तार होत आहे.
हे ही वाचा >> Gold Silver Price 2024 : धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी एवढा आहे सोन्याचा दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा भाव
अॅपलला चीनवरील अवलंबित्त्व कमी करण्यास भारताची साथ
कंपनीला चीनवरील अवलंबित्व कमी करायचं आहे आणि त्यात त्यांना भारताचा हातभार मिळत आहे. वॉशिंग्टन व बीजिंगमधील वाढता तणाव, करोना काळात अमेरिकेला बसलेला मोठा आर्थिक फटका, यांसारख्या कारणांमुळे अमेरिकेतील कंपन्यांना त्यांचं चीनवरील अवलंबित्त्व दूर करायचं आहे. त्यामुळे अमेरिकेतील अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला आहे. आयफोन कंपनीने भारतात उत्पादन सुरू करणं हा त्याचाच एक भाग आहे.
हे ही वाचा >> बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी
भारताच्या स्मार्टफोन निर्यातीत आयफोनचा मोठा वाटा
अॅपलचे प्रामुख्याने तीन मोठी पुरवठादार आहेत. त्यामध्ये तैवानमधील फॉक्सकॉन टेक्नोलॉजी समहू, पेगाट्रॉन कॉर्प, आणि भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स सध्या दक्षिण भारतात आयफोन असेम्बल करण्याचं काम करते. चेन्नईस्थित फॉक्सकॉन कंपनी भारतातील प्रमुख पुरवठादार आहे. भारतातील आयफोन निर्यातीत या कंपनीचा अर्धा वाटा आहे. भारताच्या जोरावर अॅपल कंपनी उंच झेप घेत असली तर भारतीय बाजारात मात्र आयफोनकडे केवळ सात टक्के हिस्सेदारी आहे. भारतात शाओमी, सॅमसंग व व्हिवोसारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. दरम्यान, उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे की भारताच्या स्मार्टफोन निर्यातीत आयफोनचा मोठा वाटा आहे.