Ratan Tata order of Australia : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या राजदूत यांनी ट्वीट करत दिली आहे. रतन टाटा यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रतन टाटा यांनी भारताबरोबरच ऑस्ट्रेलियासाठीही योगदान दिले आहे. ते दिग्गज उद्योगपती आहेत.
ट्विटरवर अनेक फोटोंसह एक पोस्ट शेअर करत फॅरेल लिहितात की, रतन टाटा हे भारतातील व्यवसाय, उद्योग आणि समाजहित जपणारे दिग्गज व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या योगदानाचा परिणाम ऑस्ट्रेलियातही दिसून आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील संबंधांच्या दीर्घकालीन बांधिलकीसाठी ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’च्या माध्यमातून सन्मान करताना आनंद होत आहे.
रतन टाटा यांची मानद अधिकारी म्हणून निवड
रतन टाटा यांची ऑस्ट्रेलिया-भारत द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि परोपकारासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा पॉवर ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड (TPSODL) चे कार्यकारी राहुल रंजन यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टदरम्यान या सोहळ्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.
रतन टाटा यांचे जगासाठी मोलाचे योगदान
राहुल रंजन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, रतन टाटा यांचे योगदान जगभरात मोलाचे आहे. त्यांच्या नेतृत्वगुण आणि दूरदृष्टीने अनेकांनी आपले इच्छित स्थळ गाठले आहे. रतन टाटा यांनीही अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. यासोबतच रतन टाटा यांनी चॅरिटीसाठीही अनेक कामे केली आहेत.
हेही वाचाः RBI ची मोठी कारवाई, ४ बँकांना ठोठावला ४४ लाखांचा दंड, यात तुमची बँक तर नाही ना?
कोट्यवधी रुपयांची देणगी दिली
रतन टाटा यांची कंपनी जगात समाजहित जपणारी म्हणून ओळखली जाते. त्यांनी लाखो कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रतन टाटा यांनी कोरोना महामारीच्या काळात १५०० कोटी रुपयांची देणगी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते त्यांच्या कमाईतील ६० ते ७० टक्के चॅरिटीसाठी दान करतात.