सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया (BOI)ने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात वाढ केली आहे. नवे दर १ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत. व्याजदरात सुधारणा झाल्यानंतर बँकेने ५०१ दिवसांच्या विशेष ‘शुभ आरंभ ठेव’ वरचेही व्याजदर वाढवले ​​आहेत. नवे दर २ कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या बँक एफडीवर लागू होतील. बँक ऑफ इंडिया ‘शुभ आरंभ ठेव’ (Shubh Arambh Deposit)कार्यक्रमावर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६५%, नियमित ग्राहकांसाठी ७.१५% आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८% व्याजदर देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकेची काय योजना आहे?

>> बँक ६ महिने ते १० वर्षांच्या बकेटमध्ये सुपर सीनियर सिटिझन्स (८० वर्षे आणि त्यावरील) अतिरिक्त ०.१५% व्याज देत आहे. बँक एका मर्यादित कालावधीच्या विशेष योजनेत सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८०% व्याजदर देते.
>> ७ दिवस ते ४५ दिवसांत परिपक्व (maturity) होणाऱ्या २ कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींवर ३.००% हमी व्याजाची ऑफर आहे.
>> बँक ४६ ते १७९ दिवसांत परिपक्व (maturity) होणाऱ्या एफडीवर ४.५०% व्याजदर देते
>> १८० ते २६९ दिवसांच्या ठेवींवर बँक ऑफ इंडिया ५.००% व्याज देते आणि २७० दिवस ते ऍ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ५.५०% व्याज देत आहे.
>> १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर (५०१ दिवस वगळता) ६.००% व्याजदर मिळेल आणि ५०१ दिवसांच्या मुदत ठेवींवर ७.१५% व्याज मिळेल.
>> बँक २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ६.७५% व्याजदर देत आहे, तर ३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५ वर्षांपेक्षा कमी ठेवींवर ६.५०% व्याज मिळेल.
>> पाच ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर आता ६.००% दराने व्याज मिळेल.

हेही वाचाः मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जाधीशांच्या यादीत नवव्या क्रमांकावर

ज्येष्ठ नागरिकांना किती फायदा?

बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाइटवर नमूद केले आहे की, ‘ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ मुदत ठेवींवर (२ कोटी रुपयांपेक्षा कमी) ३ वर्षांवरील सर्व कालावधीसाठी सध्याच्या ५० bps व्यतिरिक्त २५ bps चा अतिरिक्त प्रीमियम दिला जाईल. सुपर सिनियर सिटिझन्सना सध्याच्या ५० bps व्यतिरिक्त ४० bps चे अतिरिक्त व्याज मिळेल.

हेही वाचाः जागतिक बँकेने भारताच्या वाढीचा अंदाज घटवला; आर्थिक वर्ष २४ मध्ये GDP वाढ ६.३ टक्के राहण्याची शक्यता

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of india govt bank hikes interest on fds investors get strong benefit vrd
Show comments