Employees Benefit GPF Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून सामान्य भविष्य निर्वाह निधीसह इतर निधीच्या ठेवींवर पुन्हा एकदा व्याजाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. १ एप्रिल ते ३० जून २०२३ पर्यंत GPF वरील व्याजदराची रक्कम निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३-२०२४ या वर्षात सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर तत्सम निधीमधील सदस्यांच्या ठेवींवर १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत ७.१ टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल. हे १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल. यापूर्वी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत GPF वर फक्त ७.१ टक्के व्याजाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. ती व्याजाची रक्कम कायम ठेवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

GPF वर किती व्याज मिळेल?

१० एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या निवेदनात, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सांगितले की, जून तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधी ग्राहकांच्या ठेवींवर आणि इतर तत्सम निधीवर १ एप्रिलपासून ७.१ टक्के दराने व्याज मिळेल. १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ पर्यंत ७.१ टक्क्यांच्या दराने व्याज लागेल. याचा अर्थ GPF आणि इतर तत्सम PF च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. DEA ने प्रस्तावात म्हटले आहे की, हे दर १ एप्रिल २०२३ पासून लागू आहेत.

हेही वाचाः गौतम अदाणींसाठी मोठी बातमी, देशातील ७० कंपन्यांना मागे टाकत ‘ही’ कंपनी ठरली नंबर वन

EPFO व्याजदर ८.१५ टक्के होणार

याआधी ईपीएफओबाबत एक महत्त्वाची घोषणाही करण्यात आली होती. ज्यामध्ये २०२२-२३ साठी EPFO ​​चा व्याजदर ८.१५ टक्के असू शकतो, असे म्हटले होते. त्यात ०.०५ टक्के दराने वाढ करण्यात आली. EPFO ने व्याजदर ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढवल्याने तो प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला जाईल. तिथून प्रस्‍ताव मंजूर होताच प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात येईल. सध्या EPFO ​​चा व्याजदर ८.१० टक्के आहे. ज्यामध्ये ०.०५ टक्के वाढ केलेली दिसून येत आहे.

हेही वाचाः कर भरण्यात देशातील ज्येष्ठ नागरिक आघाडीवर; २०२२-२३ मध्ये एक लाख कोटींहून अधिक प्राप्तिकर जमा

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big news for employees amount of gpf interest rate fixed finance ministry issued order effective from 1 april 2023 vrd
First published on: 11-04-2023 at 16:01 IST