खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. बँकेने ५ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या एफडीसाठी व्याजदर वाढवलेत. आता ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बँक एफडीवर सामान्य ग्राहकाला वार्षिक ५.५ टक्के ते ७ टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बँक ५.५ ते ७.७५ टक्के व्याज देणार आहे. नवे व्याजदर १० एप्रिलपासून लागू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅक्सिस बँकेचे विद्यमान ग्राहक मोबाइल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन एफडी खाते उघडू शकतात. याशिवाय ग्राहक बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही हे काम करू शकतात. जे बँकेकडून कोणत्याही प्रकारची सेवा घेत नाहीत, त्यांना एफडी खाते उघडण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेत जावे लागेल. अॅक्सिस बँकेने या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.

५ ते १० कोटींच्या FD साठी नवीन दर

सामान्य ग्राहकाला आता ५ कोटी ते १० कोटींवरून ७ दिवस ते १४ दिवसांच्या मुदतपूर्ती झालेल्या FD वर ५.५० टक्के व्याज मिळेल. १० कोटी ते २४ कोटींपेक्षा कमी एफडीवर ५.५० टक्के व्याज देखील दिले जाईल. बँक १५ दिवस ते २९ दिवसांच्या FD वर ५.५०% व्याजदेखील देईल. बँक ५ कोटी ते २४ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसह ३० दिवस ते ४५ दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ५.५५ टक्के व्याज देईल. ५ कोटी ते २४ कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर ५.८० टक्के व्याज दिले जाईल, जे ४६ दिवस ते ६० दिवसांत पूर्ण होईल. १ वर्ष ते १ वर्ष आणि ४ दिवसांच्या कालावधीत पूर्ण झालेल्या FD वर ७.२५ टक्के व्याज दिले जाईल. २ वर्षांपेक्षा कमी ते ३० महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील ५ कोटी रुपयांपासून ते २४ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ७ टक्के व्याज दिले जाईल.

हेही वाचाः १० दिवसांत बँक FD पेक्षाही ५ पट परतावा; विजय केडियाच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ शेअर चांगलाच वधारला

३ ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर देखील ७ टक्के व्याज

बँकेने आता ३० महिने ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ५ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या FD वर ७% व्याज देण्याची घोषणा केली आहे. बँक १० कोटी ते २४ कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर ७% व्याज देखील देईल. ३ ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर देखील ७ टक्के व्याज मिळेल. ५ कोटींहून अधिक रकमेच्या एफडीवर ७% व्याज दिले जाईल, जे ५ वर्ष ते १० वर्षात पूर्ण होईल. त्याचप्रमाणे ५ कोटी ते २४ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर ७ टक्के व्याज दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना २ वर्ष ते १० वर्षांच्या मुदतीच्या FD वर ७.७५% व्याज मिळेल.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big private bank hikes interest on fd know new rates vrd
Show comments