भारत देश आता उत्पादन क्षेत्रासाठी जगातील पहिली पसंती बनत चालला आहे. संशोधन आणि विकास क्षेत्रातही जगभरातील कंपन्या भारतीय प्रतिभेला महत्त्व देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘पीएलआय स्कीम’ यांसारख्या अनेक योजना आणून जगभरातील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले. आता जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली बोईंगही भारतात गुंतवणूक करीत आहे. पीएम मोदी १९ जानेवारीला भारतात तयार होणाऱ्या कंपनीच्या केंद्राचे उद्घाटन करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बोईंग अमेरिकेबाहेर आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात करणार आहे. कंपनी बंगळुरूमध्ये एक अभियांत्रिकी केंद्र उभारणार आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बोईंग ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. त्यांचे मुख्यालय शिकागो येथे आहे. कंपनीचे जगभरात सुमारे १,५३,००० कर्मचारी आहेत.
अभियांत्रिकी केंद्र १६०० कोटी रुपयांमध्ये बांधले जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी बोईंगच्या नवीन अत्याधुनिक ग्लोबल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे (BIETC) उद्घाटन करणार आहेत. हे कॉम्प्लेक्स कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बंगळुरूच्या बाहेरील देवनहल्ली येथे आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बोईंगही एक कार्यक्रम सुरू करणार आहे. याची सुरुवातही पंतप्रधान मोदी करणार आहेत. कंपनी या कॅम्पसमध्ये १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हे कॅम्पस सुमारे ४३ एकरांवर पसरलेले असेल. गेल्या वर्षी बोईंगने भारतात पायलटना प्रशिक्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि इतर कार्यक्रमांवर १०० दशलक्ष डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली होती. यानंतर एअर इंडियाने बोईंगबरोबर २०० हून अधिक जेट खरेदी करण्याचा करार केला. यामध्ये ७८७ ड्रीमलायनर, ७७७X, ७३७ मॅक्स नॅरोबॉडी विमानांचा समावेश होता.
हेही वाचाः टायर बनवणाऱ्या कंपनीची जबरदस्त कामगिरी, कधी काळी ११ रुपये असलेल्या शेअरने गाठला १.५ लाखांचा उच्चांक
बोईंग जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक
बोईंग ही जगातील सर्वात मोठी एरोस्पेस कंपनी आहे. जगभरात बोईंगची १०,००० व्यावसायिक विमाने कार्यरत आहेत. बोईंगचे कमाल ३९ टक्के उत्पन्न संरक्षण, अंतराळ आणि सुरक्षा यातून येते. तर कंपनीला कमर्शिअल विमानांमधून ३२ टक्क्यांपर्यंत कमाई मिळते. ही कंपनी विमाने, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रे डिझाइन करते, बनवते आणि विकते. म्हणजेच प्राणघातक लढाऊ विमानांपासून व्यावसायिक विमानांपर्यंत सर्व काही बनवण्यात ही आंतरराष्ट्रीय कंपनी पारंगत आहे.
हेही वाचाः विश्लेषणः भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक गुंतवणूकदारांना ‘या’ ३ मुख्य चिंता; कसा मार्ग काढणार?
बोईंगने १०७ वर्षे जगावर राज्य केले
बोईंगची सुरुवात सुमारे १०७ वर्षांपूर्वी झाली. १९०३ मध्ये जेव्हा राइट ब्रदर्सने पहिल्यांदा उड्डाण केले, तेव्हा अमेरिकन उद्योगपती विल्यम ई. बोईंग यांना विमाने तयार करण्यासाठी कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली. १९१६ मध्ये त्यांनी एरो प्रॉडक्ट्स नावाची कंपनी स्थापन केली. सुमारे एक वर्षानंतर त्या कंपनीचे नाव बदलून बोईंग विमान कंपनी ठेवण्यात आले. एक वर्षानंतर १९१७ मध्ये कंपनीने आपले पहिले विमान डिझाइन केले, परंतु त्या काळातील विमानांच्या तुलनेत ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरेच मागे होते. हा तो काळ होता, जेव्हा महायुद्ध सुरू झाले होते. युद्धासाठी विमानांची गरज होती. या कालावधीत कंपनीला विमान निर्मितीसाठी ५० ऑर्डर मिळाल्या. कंपनीसाठी हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. या ऑर्डरच्या अनुभवानंतर कंपनीने विस्ताराची योजना आखली. पहिल्या महायुद्धानंतर बोईंगने व्यावसायिक विमाने बनवण्यास सुरुवात केली. बोईंग कालांतराने विस्तारत राहिली. कंपनीने आतापर्यंत ३२ कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत.
बोईंग विमानाच्या नावाची मनोरंजक कथा
बोईंग विमानांच्या क्रमांकांची नावे देण्याची कथाही रंजक आहे. सुरुवातीच्या काळात कंपनी अनुक्रमानुसार विमानांची संख्या देत असे, परंतु १९४५ नंतर जेव्हा पहिल्या व्यावसायिक जेटसाठी नावाचा विचार केला गेला, तेव्हा त्याचे नाव मॉडेल ७०० ठेवण्यात आले. मार्केटिंग टीमला हे नाव आवडले नाही आणि मॉडेल ७०७ असे नाव दिले. अशा प्रकारे बोईंग विमानांची नावे ७ अंकाने सुरू होऊन ७ अंकानेच संपली. यातूनच नावासाठी ‘७-७’ ही संकल्पना आली.
बोईंगदेखील वाईट काळातून गेली
कालांतराने बोईंग यशाच्या पायऱ्या चढत राहिली, परंतु वादांचीही त्यात भर पडली. जगात अनेक बोईंग विमाने अपघाताची कारणे बनली. यामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, मात्र कंपनीने उणिवा दूर केल्या जातील, असे सांगून वादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. बोईंगचे ७३७ मॅक्स मॉडेल सर्वाधिक वादग्रस्त राहिले. इंडोनेशियामध्ये २०१८ मध्ये आणि इथिओपियामध्ये २०१९ मध्ये विमान अपघातात ३४६ जणांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर ७३७ मॅक्स विमान सुमारे २० महिने उडू शकली नाहीत. ही विमानं जगभर चर्चेत राहिले. यानंतर कंपनीने आपल्या फ्लाइट कंट्रोल सिस्टमच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले. परिणामी, २०२१ मध्ये या मॉडेलची उड्डाणे पुन्हा सुरू झाली. फ्रेंच कंपनी एअरबसची विमाने बहुतेक भारतात वापरली जातात. देशातील डझनभर विमान कंपन्यांकडे ४७८ एअरबस आहेत, त्यानंतर बोईंग १३५ विमाने आहेत. एअर इंडियाच्या नुकत्याच झालेल्या करारानंतर बोईंग विमानांची संख्या वाढणार आहे.
बोईंगद्वारे निर्मित काही लष्करी विमाने/हेलिकॉप्टर
- C-17 Globemaster III
- CH/MH-47 Chinook
- V-22 Osprey
- AH-6 Light Attack Helicopter
- AH-64D Apache
- F/A-18E/F Super Hornet Navy fiter aircraft
- F-15E Strike Eagle tactical fighter
- Boeing Vertol CH-46 Sea Knight (Vertol Aircraft Corp.)
- Boeing AH-6.
- Boeing Vertol YUH-61.
- Boeing Vertol XCH-62.
- MH-139 Grey Wolf (with Leonardo S.p.A.)
आकासाने बोईंगलाही दिली ऑर्डर
आकासा एअरने गुरुवारी १५० बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत अस्तित्वात आलेली एअरलाइन आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सचा विस्तार करू इच्छित आहे, ज्यासाठी तिने ही ऑर्डर दिली आहे. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, नव्या ऑर्डरमध्ये ७३७ मॅक्स १० आणि ७३७ मॅक्स ८-२०० जेटचा समावेश आहे. यामुळे एअरलाइन्सला २०३२ पर्यंत सतत विमाने मिळू शकणार आहेत. यामुळे कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विस्तार योजनांना बळ मिळेल. Akasa Air ने २०२१ मध्ये ७२ Boeing ७३७ Max विमानांची प्रारंभिक ऑर्डर दिली होती. यानंतर कंपनीने जून २०२३ मध्ये चार बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांची ऑर्डर दिली.