Union Budget 2024 Live Streaming : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आता होत आहे. २२ जुलैपासून अधिवेशन सुरू झाले असून २३ जुलै म्हणजेच आज केंद्र सरकारच्या वतीने अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. मोदी ३.० सरकारकडून सामान्य माणसाला काय मिळणार? याची उत्सुकता आता संपूर्ण देशाला लागली आहे. विरोधकांचेही या अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे. अर्थसंल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक कसे असणार आहे? यावेळी काही वेगळेपण आहे का? याबद्दल जाणून घेऊ.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंबंधी माहिती दिली होती. एक्सवर केलेल्या पोस्टनुसार २२ जुलै रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. तर,आज अर्थसंकल्प सादर होऊन त्या दिवसाचे कामकाज संपेल. त्यानंतर अर्थसंकल्पावर सदस्य आपले विचार मांडतील. तसेच १२ ऑगस्ट रोजी अर्थसंकल्पाचा शेवट होईल, अशी माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी दिली.

हे वाचा >> गोष्ट भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाची! कधी, कसा आणि कुणी सादर केला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प?

अर्थसंकल्प कुठे पाहता येईल?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. सरकारशी निगडित वृत्तवाहिन्या जसे की, दूरदर्शन, संसदेच्या वाहिन्या, सरकारी युट्यूब चॅनेल संसद टीव्ही यावर पाहता येईल. ज्या लोकांना ऑनलाईन अर्थसंकल्प ऐकायचा आहे आणि त्याच्याशी संबंधित दस्तऐवज पाहायचे आहेत, अशा लोकांसाठी इंडियन बजेट डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. तसेच तिथे अर्थसंकल्पाशी निगडित भाषण आणि इतर दस्तऐवजही मिळेल. तसंच, लोकसत्ताच्या संकेतस्थळावरही याचे अपडेट्स देण्यात येत आहेत.

हे ही वाचा >> Union Budget 2024 : हलवा समारंभ संपन्न, दरवर्षी का साजरी केली जाते ही परंपरा?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर आता एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्पही त्याच सादर करणार आहेत. सलग सातवेळा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरणार आहेत. याआधी माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

Budget 2024, Budget 2024 News in Marathi, Budget Marathi News, Marathi News in Marathi, Budget in Marathi, Budget 2024 Live Streaming, Budget 2024 Date and Time, Interim Budget 2024,
Interim Budget 2024 Live Streaming : अर्थसंकल्प समजून घेताना…

Budget 2024 Live Streaming : अर्थसंकल्प समजून घेताना…

केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक आघाड्यावरील निर्णय घेतले जातील, असे सुतोवाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात केले होते.

Story img Loader