Castrol India: कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केदार लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून ते कार्यभार स्वीकारतील. केदार लेले यांनी यापूर्वी दक्षिण आशियातील हिंदूस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) मध्ये सेल्स अँड कस्टमर डेव्हलपमेंट विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. लेले यांच्या नियुक्तीमुळे आता कॅस्ट्रॉल इंडियाच्या व्यापार वृद्धी आणि नाविन्यतेला चालना मिळणार असल्याचे बोलले जाते.
केदार लेले यांनी हिंदूस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) मध्ये जवळपास दोन दशक सेवा दिली आहे. लेले यांच्या नियुक्तीवर कॅस्ट्रॉल इंडियाचे अध्यक्ष राकेश मखिजा यांनी सांगितले की, केदार लेले यांचे आम्ही कॅस्ट्रॉल इंडियामध्ये स्वागत करत आहोत. त्यांचा दीर्घ अनुभव आमच्या टीमसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. यानिमित्ताने मी संदीप सांगवन यांचेही अभिनंदन व्यक्त करेन, ज्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये कॅस्ट्रॉल इंडियासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्यामुळेच कॅस्ट्रॉल इंडियाला बाजारात आपले महत्त्व कायम करता आले.