भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणारे तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये १६ खासदार जिंकून आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्याकडे संबंध देशाच्या नजरा खिळल्या. आता चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचीही चर्चा होत आहे. एक्झिट पोलच्या दिवशी शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली होती. मात्र निकालाच्या दिवशी बाजाराचा निर्देशांक आपटला. या काळात सामान्य गुंतवणूकदारांना कमावलेल्या नफ्यावर पाणी सोडावे लागले. मात्र नारा भुवनेश्वरी यांनी मागच्या पाच दिवसांत शेअर बाजारात ५७९ कोटींची कमाई केली आहे. या शेअरबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेरिटेज फुड्स या शेअरमध्ये मागच्या पाच दिवसांत ५५ टक्क्यांची घसघशीत वाढ पाहायला मिळाली आहे. खाद्य क्षेत्राशी संबंधित असलेली हेरिटेज फुड्स ही कंपनी दक्षिण भारतातील डेअरी उत्पादनाशी संबंधित सर्वात मोठी कंपनी आहे. नारा भुवनेश्वरी यांची या कंपनीत २४.३७ टक्के भागीदारी आहे.

चंद्राबाबू नायडूंचा नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव, ‘इंडिया आघाडी’च्या आकांक्षांवर पाणी?

मागच्या पाच दिवसात हेरिटेज फुड्सच्या शेअरमध्ये झालेली वाढ

नारा भुवनेश्वरी या कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे २,२६,११,५२५ एवढे शेअर्स आहेत. कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत आणि कार्यपद्धतीवर त्यांची चांगली पकड असल्याचे यातून दिसून येते. ३१ मे २०२४ रोजी हेरिजेट फुड्सच्या शेअरची किंमत केवळ ४०२.९० एवढी होती. मागच्या पाच दिवसांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. निकालाच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात मोठी पडझड होऊनही या शेअरच्या किंमतीमध्ये फार मोठी वाढ झाली आहे.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आज संसद भवनात एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक पार पडत असताना नारा भुवनेश्वरी यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष हा एनडीएमधला प्रमुख घटक पक्ष झाला आहे. भाजपाला २७२ चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीडीपीच्या १६ खासदारांची आवश्यकता भासणार आहे. एनडीएच्या घटक पक्षांनी मिळून संसदेच्या ५४३ जागांपैकी २९३ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपाने २४० जागा जिंकल्या आहेत.