Multibagger Stock : शेअर बाजारात आज एका खासगी क्षेत्रातील दिग्गज बँकेच्या समभागांनी गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा मिळवून दिला आहे. 9 महिन्यांपूर्वी त्या बँकेचे शेअर्स फक्त 8 रुपये होते आणि आता ते दुप्पट झाले आहेत, म्हणजेच गुंतवणूकदारांचे भांडवल केवळ 9 महिन्यांत दुप्पट झाले आहे. बाजारातील जाणकारांच्या मते त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक असलेल्या साऊथ इंडियन बँके(SOUTH INDIAN BANK)च्या शेअर्सनं प्रचंड मोठ्या प्रमाणात उसळी घेतली असून, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
बँकेचे शेअर ९ महिन्यांपूर्वी फक्त ८ रुपयांच्या जवळपास होते, ते वाढून आता दुप्पट झाले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांची कमाई नऊ महिन्यांत दुप्पट झाली आहे. घरगुती ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यात गुंतवणुकीसाठी २५ रुपयांचं टार्गेट ठरवलं आहे. जे मूळच्या समभागांच्या भावाच्या ४५ टक्के जास्त आहे. या बँकेचे शेअर्स सध्या मुंबई शेअर बाजारात १७.२७ रुपयांवर (SOUTH INDIAN BANK) व्यापार करीत आहेत.
SOUTH INDIAN BANK च्या शेअर्समध्ये वेगाने पैसे दुप्पट
साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स २० जून २०२२ ला ७.२७ रुपयांच्या किमतीवर व्यापार करीत होते. तो त्यांचा सगळ्यात नीचांकी स्तर होता. त्यानंतर सहा महिन्यांनी २०० टक्क्यांची उसळी घेत १५ डिसेंबर २०२२ ला शेअर्स २१.८० रुपयांवर पोहोचला, जो एका वर्षातील उच्च स्तर होता, म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे सहा महिन्यात तिप्पट वाढले आहेत. समभागातील उसळी इथेच थांबली आणि त्यानंतर उच्च स्तरावरून ते २१ टक्क्यांपर्यंत घसरले. सध्या त्या शेअर्सचा भाव १७.२७ रुपये आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD)आल्यानंतर नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) आणि अॅसेट क्वालिटीवर जास्त जोर देण्यात आला आहे. त्यामुळेच बॅलन्सशीट वेगानं मजबूत होत आहे. ब्रोकरेजनुसार, नव्या एमडींच्या नेतृत्वात बँक सुधारणा करण्यात यशस्वी ठरली आहे. बँकेनं आपल्या व्यवसायाच्या रचनेत आमूलाग्र बदल केला आहे. कलेक्शन्स आणि रिकव्हरीसाठी वेगळी टीम तयार करण्यात आली आहे. जेणेकरून वसुलीच्या माध्यमातून आर्थिक तूट कमी केली जाईल. डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत याचा आर्थिक तुटीचे प्रमाण तिमाही आधारावर २.९ टक्क्यांनी घसरून २ टक्क्यांवर आले आहे. तसेच बँक वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या टीम बनवून आपली स्थिती मजबूत करीत आहे. ब्रोकरेजनं त्यांच्या खरेदीची रेटिंग कायम ठेवली असून, २५ रुपयांचं टार्गेट ठरवलं आहे.