FirstCry IPO Sachin Tendulkar Profit: ‘फर्स्टक्राय’ची पालक कंपनी असलेल्या ब्रेनबीज सोल्युशन्सचा समभाग प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या ४६५ रुपयांच्या तुलनेत दिवसअखेर तो ४६.०६ टक्क्यांनी वधारून ६७९.१० रुपयांवर स्थिरावला. या आयपीओमधून काही दिग्गज गुंतवणूकदारांनी बक्कळ पैसे कमविले आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हर्ष मारीवाला, रंजन पै आणि कंवलजीत सिंह यांनी या आयपोओच्या माध्यमातून चांगला नफा कमविला आहे. आयपीओ जाहीर झाल्यानंतर या सुरुवातीच्या सत्रात १० टक्क्यांची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे थोडेसे नुकसान झाले, मात्र नंतर हे नुकसान भरून निघाले.

सचिन तेंडुलकर आणि इतर गुंतवणूकदारांनी हा आयपीओ ४८७.४४ खरेदी केला होता. त्यात दिवसअखेर ४५ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे सचिन तेंडुलकरसह इतर मोठ्या गुंतवणूकदारांनी ३८ टक्क्यांचा नफा नोंदविला.

Which bank gives highest interest rates on Fixed Deposit
Latest FD Rates: कोणत्या बँकेकडून एफडीवर सर्वाधिक व्याज मिळेल? ऑगस्ट महिन्यातील ताजे व्याज दर जाणून घ्या
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Mauritius FSC remark on Hindenburg Research
Mauritius FSC : हिंडेनबर्गच्या सेबी अध्यक्षांवरील आरोपांवर मॉरिशसची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचा देश…”
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

हे वाचा >> दमदार बाजार पदार्पणाचे नवउद्यमींमध्ये नव्याने पर्व; ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय, युनिकॉमर्सची सूचिबद्धता फलदायी

सचिन तेंडुलकर यांचा नेमका नफा किती?

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने फर्स्टक्राय आयपीओमध्ये ९.९९ कोटींची गुंतवणूक केली होती. समभाग वधारल्यानंतर ही गुंतवणूक १३.८२ कोटींवर पोहोचली. तर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याकडे आयपीओ येण्याआधी फर्स्टक्रायचे ७७,९०० समभाग होते. ८४.७२ रुपये या सरासरीने त्यांनी हे समभाग विकत घेतले होते. रतन टाटा यांनी यापैकी अनेक समभाग विकल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्यांनी किती समभाग विकले, याची ठाम माहिती समजलेली नाही.

रतन टाटा यांनी ज्या किंमतीमध्ये फर्स्टक्रायचे समभाग विकत घेतले होते, त्या तुलनेत आयपीओ ज्या किमतीला जाहीर झाला, त्यामध्ये रतन टाटा यांनी पाच पट अधिक नफा कमावला आहे. जर टाटा हे समभाग न विकता कायम ठेवणार असतील तर त्यांचा नफा सात पटीने अधिक वाढलेला असेल. याचबरोबर महिंद्रा आणि महिंद्राने ७७.९६ रुपयांना एक समभाग याप्रमाणे फर्स्टक्रायने ११ टक्के समभाग विकत घेतले होते. महिंद्रा आणि महिंद्रानेही सात पटीने अधिक नफा मिळविला आहे.

मागच्या वर्षी सॉफ्टबँक आणि फर्स्टक्रायचे संस्थापक सुपम माहेश्वरी यांनी आपल्याकडी समभागांची विक्री केली होती. माहेश्वरी यांच्याकडे सध्या कंपनीचे ५.९५ टक्के समभाग आहेत. आयपीओच्या आधी २०२३ साली त्यांनी ३०० कोटींच्या समभागांची विक्री केली होती.

सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली यांनी फर्स्टक्रायचे दोन लाख समभाग विकत घेतले आहेत. तर मारीवाला कुटुबांने २०.५ लाख समभाग विकत घेतले आहेत. रंजन पै यांच्या कुटुंबाने ५१.३लाख, कंवलजीत सिंह यांनी तीन लाख, इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिस गोपाळकृष्णन कुटुंबाने ६ लाख आणि डीएसपीच्या संस्थापक हेमांद्री कोठारी यांनी ८ लाख २० हजार समभाग विकत घेतले आहेत.