वेळेवर कर न भरल्यामुळे जीएसटी नोंदणीही (GST Registration) रद्द झाली असेल तर आता घाबरण्याची गरज नाही. सरकारने एक दिलासादायक संधी दिली आहे. वेळेवर कर न भरल्यामुळे नोंदणी रद्द झालेल्या अशा कंपन्या व्यवसाय कर, व्याज आणि दंड भरल्यानंतर ३० जूनपूर्वी नोंदणी पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. केंद्रीय जीएसटी कायद्यात सुधारणा करताना अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या कंपन्यांची जीएसटी नोंदणी ३१ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी रद्द करण्यात आली आहे आणि त्यांनी निर्धारित वेळेत नोंदणी पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज केला नसल्यास तर आता त्यांच्याकडे जूनपर्यंत वेळ आहे. यासाठी ३० जून २०२३ ही डेडलाइन देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोंदणीसाठी कर्ज फेडावे लागेल अन् व्याज-दंड भरावा लागेल

खरं तर नोंदणी रद्द केल्याच्या तारखेपर्यंत थकबाकी परतावा किंवा व्याज, दंड आणि विलंब शुल्क यांसारखी इतर कोणतीही देयके भरल्यानंतरच हा अर्ज केला जाऊ शकतो.

हेही वाचाः देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी Good News, मार्चमध्ये GST संकलन १३ टक्क्यांनी वाढले

मार्चमध्ये जीएसटी संकलन १३% वाढले, १.६० लाख कोटी तिजोरीत आले

विशेष म्हणजे जीएसटी संकलनाच्या आकडेवारीत पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. मार्च २०२३ मध्ये देशातील जीएसटी संकलन १३ टक्क्यांनी वाढून १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जीएसटी संकलनाच्या बाबतीत गेल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना (२०२२-२३) चांगला राहिला आहे. जीएसटीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे संकलन आहे, अशी माहितीही अर्थ मंत्रालयाने शनिवारी दिली आहे.

हेही वाचाः बँकिंग क्षेत्रात जसे एसबीआय, एचडीएफसीची मक्तेदारी; त्याचप्रमाणे विमा क्षेत्रातही आता ‘या’ कंपन्यांचा ‘राज’

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company registration got canceled due to non filing of gst government has given a chance for restoration know more vrd
Show comments