लहान बचत योजनांवरील व्याजदर सलग तीन वेळा वाढल्यामुळे पोस्ट ऑफिस एफडी आता बँक एफडी (Post Office FD vs Bank FD) च्या तुलनेत चांगला परतावा देणाऱ्या सिद्ध होत आहेत. लहान बचत योजनांतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्के व्याज मिळत आहे, जे बहुतेक बँकांना त्याच कालावधीच्या FD वर मिळालेल्या परताव्यांपेक्षा जास्त आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे हे घडत आहे. बँकांनी अधिक पैसे जमा करण्यासाठी ठेवींवर अधिक व्याज देण्यास सुरुवात केली. परिणामी, मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान बँकांच्या नवीन ठेवींवरील सरासरी देशांतर्गत मुदत ठेव दर (WADTDR) २.२२ टक्क्यांनी वाढला. जिथे २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकांचा भर घाऊक ठेवींवर जास्त होता, तर दुसऱ्या सहामाहीत त्यांचे प्राधान्य बदलले आणि त्यांनी किरकोळ ठेवी वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले. व्याजदरात झालेली वाढ हा त्याचाच एक भाग होता. विशेष म्हणजे या काळात बँकांनी कर्जावरील व्याजातही सातत्याने वाढ केली.

Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!
interest rate on foreign currency deposits increased step to revive falling rupee
परदेशी चलनांतील ठेवींवरील व्याजदर मर्यादेत वाढ; ढासळत्या रुपयाला सावरण्यासाठी पाऊल
reserve bank predict retail inflation at 4 9 percent for the fy25
महागाईचे चटके वाढणार; रिझर्व्ह बँकेचा चालू आर्थिक वर्षासाठी ४.९ टक्क्यांचा अंदाज
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?

हेही वाचाः रतन टाटांच्या दोन कंपन्यांनी रेखा झुनझुनवालांना १५ मिनिटांत कमावून दिले ४०० कोटी, तुम्हीही आताच खरेदी करा हे शेअर्स

सरकारने व्याजदरातही वाढ केली

सरकारने लहान बचत योजनांसाठी (SSI) ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी ०.१-०.३ टक्के, जानेवारी-मार्च तिमाहीसाठी ०.२-१.१ टक्के आणि एप्रिल-जून २०२३ तिमाहीसाठी ०.१-०.७ टक्के व्याजदर वाढवले ​​आहेत. याआधी सलग नऊ तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीपासून २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

पोस्ट ऑफिस एफडी स्पर्धेत देतेय टक्कर

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, “बँकांचे एफडी दर आता पोस्ट ऑफिस एफडी दरांशी स्पर्धा करीत आहेत.” रिझर्व्ह बँकेच्या मते, एक ते दोन वर्षांच्या मुदतीच्या बँक एफडीवर २०२३ मध्ये सरासरी व्याज ६.९ टक्के असेल. सप्टेंबर २०२२ मध्ये तो ५.८ टक्के होता. छोट्या बचत योजनांवरील व्याजदर सलग तीन वेळा वाढवल्यानंतर २ वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीवर आता ६.९ टक्के परतावा मिळत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये हा दर ५.५ टक्के होता. देशातील सर्वात मोठी बँक SBI एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ६.८ टक्के व्याज देत आहे.

हेही वाचाः PM Kisan Samman Nidhi : १४व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट; ‘या’ महिन्यात येऊ शकतात पैसे

Story img Loader