Cowin पोर्टलवरून डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि पासपोर्टचा तपशील लीक झाल्याचा एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसला मिळाली आहे.

कोविड लसीकरण पोर्टल कोविनवरून डेटा लीक झाल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये लोकांनी लसीकरणासाठी त्यांचे वैयक्तिक तपशील दिले होते. जेव्हा कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टेलिग्राम बॉटवर टाकला जातो, तेव्हा लिंग, डीओबी आणि लसीकरण केंद्राचे नाव आणि त्याचा डोस यासह लसीकरणासाठी वापरलेला ओळखपत्र क्रमांक उघड होतो. या डेटा ब्रीचमुळे टेलिग्रामवर प्रत्येकासाठी भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट क्रमांक उपलब्ध असल्याचं दिसतंय. जेव्हा लसीचे डोस उपलब्ध होते, तेव्हा लोक एकाच मोबाइल नंबरसह अनेक कुटुंबातील सदस्यांसाठी स्लॉट बुक करायचे.

Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Two female victims rescued after raid on prostitutes at spa centre Pune news
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका
Citizens are being duped into digital arrest traps created by cyber criminals
`डिजिटल अरेस्ट’ ठाणेकरांची अवघ्या ११ महिन्यांत सात कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक
sweden gangs recruiting children
‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’साठी लहान मुलांचा वापर; स्नॅपचॅट आणि टेलीग्रामच्या माध्यमातून फसवणूक, काय आहे प्रकरण?

रिपोर्टनुसार, जर अनेक लोकांनी एकाच मोबाइल नंबरवर नोंदणी केली असेल, तर टेलिग्राम बॉट त्या सर्वांची माहिती एकाच वेळी दाखवत आहे. “आम्ही या समस्येची दखल घेतली आहे आणि मूळ कारणाचा तपास सुरू केला आहे आणि डेटा CoWIN किंवा इतर कुठूनही लीक झाला आहे की नाही याची चौकशी सुरू केली आहे,” असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ते साकेत गोखले यांनीही कोविनचा डेटा लीक झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर डेटा लीकशी संबंधित स्क्रीनशॉटदेखील शेअर केले आहेत. यामध्ये माजी गृह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह अनेक राजकारणी आणि पत्रकारांचा डेटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांचाही समावेश आहे. आधार क्रमांक आणि डीओबीच्या शेवटच्या चार वर्णांसह त्यांचा क्रमांक टाकला असता उत्तराखंडमधील कोटद्वार येथील आमदार खंडुरी भूषण यांची पत्नी रितू खंडुरी भूषण यांचा तपशीलही समोर आला. तरीही टेलिग्रामवर डेटा कसा लीक झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. २०२१ मध्येही भारतातील लस नोंदणी पोर्टल कोविन हॅक केले गेले होते आणि १५० दशलक्ष लोकांचा डेटाबेस विक्रीसाठी आहे, असा दावा करण्यात येत होता. अनेक सायबर सुरक्षा संशोधकांनी हा दावा नाकारला आणि त्यामागील वेबसाइट बनावट असल्याचे म्हटले होते.

Story img Loader