जगातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी टेस्ला नवीन वर्षात म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये भारतातील बाजारपेठेत आगमन होण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्निया येथील टेस्ला मोटार उत्पादन होत असलेल्या कारखान्याला भेट दिली. मात्र, टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पियुष गोयल यांची माफी मागितली आहे.

नेमकं काय झालं?

पीयुष गोयल यांनी कॅलिफोर्निया येथील टेस्ला मोटार उत्पादन होत असलेल्या कारखान्याला भेट दिली. पण, प्रकृतीच्या कारणास्तव मस्क यांना पियुष गोयल यांना भेटता आलं नाही. म्हणून मस्क यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून पियुष गोयल यांची माफी मागितली आहे.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

हेही वाचा : टेस्ला कंपनी आता भारतात वाहनांचे उत्पादन करणार? वर्षभरात कोणत्या गोष्टी बदलल्या?

पीयूष गोयल ‘एक्स’ अकाउंटवर म्हणाले, “कॅलिफॉर्निया येथील टेस्लाच्या मोटार उत्पादन कारखान्यास भेट दिली. टेस्लात भारतीय अभियांत्रिक वरिष्ठ पदावर काम करतात. ते टेस्लाच्या परिवर्तनामध्ये देत असलेल्या योगदानाबद्दल पाहून आनंद झाला.”

हेही वाचा : Tesla पुण्यात! भारतातील पहिले कार्यालय विमाननगरमध्ये

“टेस्लाने वाहनिर्मितीसाठी भारतातून सुटे भाग आयात केले आहेत. याचा अभिमान वाटतो. आगामी काळात सुटे भागाची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे. मस्क यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा,” असं पियुष गोयल यांनी म्हटलं.

यावर एलॉन मस्क म्हणाले, “तुम्ही टेस्लाला दिलेली भेट ही अभिमानास्पद बाब आहे. कॅलिफोर्नियाला येथे आपली भेट घेऊ शकलो नाही, याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. लवकरच आपली भेट होईल, अशी आशा व्यक्त करतो.”