तुम्ही सरकारी किंवा खासगी कर्मचारी असाल आणि तुम्हाला पगार झाल्यानंतरही अचानक पैशांची गरज भासली तर काय कराल? अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. विशेष म्हणजे EPF खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असलात तरी घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या तुमच्या EPF खात्यातून सहज पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून घरी बसून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला काही महत्त्वाच्या पायऱ्या फॉलो कराव्या लागतील. यामुळे तुमचे पैसे काही दिवसात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. EPFO भारतातील सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार संस्था असून, तिच्या सदस्यांना तीन सामाजिक सुरक्षा कार्यक्रम प्रदान करते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), पेन्शन योजना आणि कर्मचाऱ्यांसाठी विमा कार्यक्रम या तिन्ही योजना १९५२ ची मध्ये सुरू झाल्यात. EPF योजना, १९९५ ची पेन्शन प्रणाली (EPS) आणि १९७६ ची विमा योजना (EDLI) त्यांच्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करतात. येथे सर्वात आवश्यक ६ ईपीएफ क्लेम फॉर्मची यादी आहे, ज्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही पैसे काढू शकता.

हेही वाचाः बँकेत एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ बँकेने व्याजदर वाढवले

कोणता फॉर्म कधी वापरला जातो?

फॉर्म १० C: तुम्ही या फॉर्मचा वापर तुमच्या कंपनीच्या NEPS योजनेतील योगदानातून पैसे काढण्यासाठी करू शकता.
फॉर्म १० D: तुम्ही मासिक पेन्शन मिळवण्यासाठी हा फॉर्म वापरू शकता.
फॉर्म ३१ : हा फॉर्म कर्ज घेण्यासाठी आणि तुमच्या EPF खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरला जातो.
फॉर्म १३ : हा फॉर्म तुम्हाला तुमचा निधी एका कामातून दुसर्‍या नोकरीत हस्तांतरित करण्याची परवानगी देतो. हे सुनिश्चित केले जाते की, तुमचा निधी एकाच ठिकाणी आहे.
फॉर्म २०: या फॉर्मचा वापर करून तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा नॉमिनी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पीएफ फंड मिळवू शकतात आणि तुमची सेवा १० वर्षांपेक्षा कमी असली तरीही हे लागू होते.
फॉर्म ५१F: फॉर्म ५१F तुमचा नॉमिनी कर्मचार्‍यांच्या डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्सच्या विमा लाभांचा दावा करण्यासाठी वापरू शकतो.

हेही वाचाः बँकेतून आता पोस्टातील बचत खाते, PPF आणि SSA मध्ये पैसे पाठवणं झालं सोपं, सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo you can withdraw money from pf account sitting at home these forms will have to be filled for claim vrd
Show comments