युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीमध्ये मंदी आली आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपासून जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीच्या छायेत होती, परंतु आता जीडीपीचे आकडे समोर आल्यानं त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जीडीपीचे आकडे पाहता जर्मनी मंदीच्या गर्तेत अडकली असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, जर्मनीचा जीडीपी सलग दोन तिमाहीत घसरला आहे.

२०२३ च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या तिमाही आकडेवारीनुसार, वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी ०.३ टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी २०२२ च्या चौथ्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी ०.५ टक्क्यांनी घसरला होता. जेव्हा जेव्हा एखादी अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवते, तेव्हा ती मंदीमध्ये असल्याचे मानले जाते.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?

जनतेला महागाईचा भार सहन होईना

जर्मनीतील महागाईच्या स्थितीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. रशियाकडून ऊर्जा पुरवठ्याचा इशारा दिल्यानंतर महागाई वाढत आहे. घरगुती वस्तूंच्या वापरात १.२ टक्के घट झाली आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे, परंतु कोरोनाच्या काळापासून त्यांच्या निर्यातीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जर्मनी हा देश अजूनही कोरोनाच्या तडाख्यातून बाहेर पडू शकलेला नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर काहीसा दिलासा नक्कीच मिळाला असला तरी उंटाच्या तोंडात जिरे ही म्हणीसारखीच अवस्था आहे.

हेही वाचाः जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, २००० रुपयांची नोट बदलायची असल्यास बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहा

उत्पादन क्षेत्रावर मोठं संकट

जर्मनीची दुसरी सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे उत्पादन क्षेत्र. जर्मनीच्या या क्षेत्रासमोर गंभीर आव्हाने आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. बँकांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाची कमतरता आणि कामगारांची उपलब्धता अडचणीत भर घालत आहे. जर्मन सेंट्रल बँकेच्या मते, २०२१ च्या शेवटच्या टप्प्यात परिस्थिती निश्चितच सुधारली होती, परंतु २०२२ च्या आकडेवारीने या सुधारणेच्या आशा धुळीस मिळवल्या.

हेही वाचाः २००० रुपयांची नोट द्या अन् २१०० रुपयांचे सामान घेऊन जा, दुकानदाराच्या ‘या’ ऑफरने नेटकऱ्यांना घातली भुरळ

युक्रेन संकटाचाही परिणाम दिसून आला

मॅन्युफॅक्चरिंग, महागाई, जर्मनीला कोरोनापूर्वीही फटका बसला होता. रशिया-युक्रेनने त्यात भर टाकण्याचं काम केले. खरे तर जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत अशी १०० हून अधिक क्षेत्रे होती, जी रशियाला मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवा पुरवत असतात. परंतु रशिया-युक्रेन युद्धाने सर्व काम थांबले होते. दुसरीकडे जर्मनीचा गॅस पुरवठाही मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धाने येथेही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे.

Story img Loader