देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड दिवसागणिक वाढत चालला आहे. प्रत्यक्षात मे महिन्यात क्रेडिट कार्डवरील खर्चात विक्रमी वाढ होऊन १.४ लाख कोटी रुपये झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नुकत्याच आलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डांचा खर्च किंवा थकबाकीची रक्कम संपूर्ण वर्षभरात एका मर्यादेत राहिली. यंदा त्यात मासिक आधारावर ५ टक्के वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, यंदा वापरात असलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या जानेवारीपासून ५० लाखांहून अधिकने वाढून मेमध्ये विक्रमी ८.७४ कोटींवर पोहोचली आहे.
देशात एप्रिलमध्ये ८.६५ कोटी कार्डे सक्रिय
नवीन कार्डांबद्दल बोलायचे झाल्यास चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांतच २० लाख कार्डे वापरण्यात आली आहेत. जानेवारी २०२३ मध्ये देशात ८.२४ कोटी सक्रिय क्रेडिट कार्डे होती. ही संख्या झपाट्याने वाढत असून, फेब्रुवारीमध्ये ८.३३ कोटी, मार्चमध्ये ८.५३ कोटी, एप्रिलमध्ये ८.६५ कोटींवर पोहोचली आहे.
क्रेडिट कार्डच्या सरासरी खर्चानेही १६,१४४ रुपयांचा नवा उच्चांक गाठला
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये क्रेडिट कार्डांवरील खर्च संपूर्ण वर्षासाठी १.१-१.२ लाख कोटी रुपये राहिला, परंतु चालू आर्थिक वर्षात तो मे महिन्यात १.४ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. क्रेडिट कार्डांवरील प्रत्येकाचा सरासरी खर्च जवळपास १६,१४४ रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला आहे, असंही आरबीआयनं सांगितले.
हेही वाचाः गेल्या १५ दिवसांत DIIs ची १०,००० कोटी रुपयांहून अधिकची विक्री
HDFC बँकेकडे सर्वाधिक सक्रिय क्रेडिट कार्डे
मे महिन्यात एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १.८१ कोटी सक्रिय व्यवहार झाले. क्रेडिट कार्डच्या थकबाकीच्या बाबतीत बँक २८.५ टक्के शेअरसह यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर १.७१ कोटी SBI कार्डे वापरात होती. यानंतर आयसीआयसीआय बँकेची १.४६ कोटी कार्डे वापरात होती. अॅक्सिस बँक १.२४ कोटी क्रेडिट कार्डांसह चौथ्या स्थानावर होती.
हेही वाचाः दोन लाखांच्या गुंतवणुकीने सुरुवात अन् आज २ लाख कोटींचे मालक, आता कन्येच्या हाती कंपनीची कमान
देशातील सर्वात मोठ्या क्रेडिट कार्ड कंपन्या
HDFC बँक – १.८१ कोटी
एसबीआय कार्ड – १.७१ कोटी
ICICI बँक – १.४६ कोटी
अॅक्सिस बँक – १.२४ कोटी